नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरातील दहशतवाद्यांना आश्रय देणारा पाकिस्तान सध्या टेन्शनमध्ये आहे. अमेरिकेच्या गुप्त माहितीवर इस्त्रायलने अल-कायदाच्या नंबर दोनला इराणमध्ये घुसून ठार केले. मोसादच्या हिट स्क्वाडने इराणमध्ये घुसून अलकायदाचा नंबर 2 चा म्होरक्या अबू मोहम्मद अल-मस्त्री आणि त्याची मुलगी मरियम यांना ठार केले. मरियम ओसामा बिना लादेनची सून होती आणि विधवा झाल्यानंतर आपल्या वडिलांकडून अल-कायदाला चालवणे तसेच हल्ल्याचा कट रचण्याचे ट्रेनिंग घेत होती.
माहितीनुसार, अमेरिकेत 1998 मध्ये केनिया आणि तंजानियाच्या अमेरिकेन दुतावासांवर दहशतवादी संघटना अलकायदाने भीषण हल्ले केले होते, ज्यामध्ये अनेक लोक मारले गेले होते. तेव्हा अल – कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनने या दुतावासांवरील हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. तेव्हापासून अल-कायदाचा नंबर 2 चा म्होरक्या अबू मोहम्मद अल मस्त्री इराणमध्ये लपून बसला होता.
अमेरिका आणि इस्त्रायलची गुप्तचर एजन्सी मोसादचे जवान सतत इराणमध्ये अबू मोहम्मद मस्त्रीच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. अखेर इस्त्रायली जवानांनी अल-कायदाचा म्होरक्या अबू मोहम्मद अल मस्त्रीला हल्ल्याला एकवर्ष पूर्ण होत असतानाच ठार केले.
अल – कायदाच्या या भीषण हल्ल्यात 224 लोक मारले गेले होते आणि अनेकजण जखमी झाले होते. अबू ला या हल्ल्याचा मास्टर माईंड मानले जात होते. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अल-कायदाचा दुसर्या नंबरचा नेता अबू मोहम्मद ऊर्फ अब्दुल्ला अहमद अब्दुल्लाला त्याच्या मुलीसह 7 ऑगस्टला तेहरानच्या रस्त्यावर गोळ्या घालून ठार केले होते. असे समजले जात आहे की, अमेरिकेच्या बदल्याला इस्त्रायल गुप्तचर एजन्सी मोसादच्या सीक्रेट पथकाने प्रत्यक्ष घडवून आणले.
माहितीनुसार, अल – कायदा प्रमुख 7 ऑगस्टला आपल्या कारने रात्री 9 वाजता जात होता. या दरम्यान दोन बंदूकधारी आले आणि त्यांनी कार थांबवली आणि अबू मोहम्मद आणि त्याच्या मुलीला गोळ्या मारून ठार केले. मरियमचा विवाह ओसामा बिना लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनशी झाला होता. हमजा अगोदरच मारला गेला आहे.