अकोला : बहुजननामा ऑनलाईन – संबंध महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना शासनाकडून बळीराजाला होत असलेल्या मदत व पुनर्वसनाच्या कामास हातभार लागावा म्हणून राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी जून महिन्याच्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये देण्याचे आवाहन शासनामार्फत २० जून रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकात करण्यात आले आहे. राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या अनुमतीने वेतनातून एक दिवसाच्या वेतनाची रक्कम कपात करण्यात येणार आहे.
राज्यात पडलेल्या दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे परंतु यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याने दुष्काळग्रस्थांसाठी मदत व पुनर्वसनाच्या कामात हातभार लागावा म्हणून महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्यावतीने राज्यातील दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांच्या जून महिन्याच्या पगारातून दिवसाचा पगार कपात करण्याचा प्रस्ताव ६ जून रोजीच्या पत्रान्वये शासनाला देण्यात आला आहे.
त्यानुसार राज्य शासनांतर्गत येणारे सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये, तसेच स्वायत्त संस्थेचे विभाग प्रमुख-कार्यालय प्रमुखांनी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या एक दिवसाचे वेतन कपातीस त्यांची अनुमती घेऊन, एक दिवसाच्या वेतनाची रक्कम रोखपालांकडे सुपूर्द करण्यासाठी सूचित करण्याच्या सूचना परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.अधिकाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात येणार असून, वेतनाची उर्वरित रक्कम संबंधित अधिकाऱ्यांना अदा करण्याच्या सूचनाही शासनाच्या परिपत्रकात देण्यात आल्या.
तुमचे आरोग्य कसे आहे ? याचे उत्तर देईल तुमची जीभ
‘संत्रे’ आरोग्य आणि त्वचेसाठी अत्यंत लाभदायक फळ
शरीराचा गंध सांगेल तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलु
भारतातील ‘या’ ७ योगगुरूंचे जगभरात ‘फालोअर्स’, जाणून घ्या त्यांच्याबद्दल