पुणे : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यापासून जवळ असलेल्या घोटवडे येथील फार्म हाऊसला आग लागल्याची घटना आज सायंकाळी घडली. या आघीनंतर निर्माण झालेले धुराचे लोट दूरपर्यंत दिसू लागले होते.
पुणे शहरापासून काही अंतरावरच मुळा नदीच्या तीरावर घोटवडे येथे अजित पवार यांचे फार्म हाऊस आहे. राज्यात सर्वत्र पाऊस पडत असताना या फार्म हाऊसमध्ये आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आग लागली. या आगीमुळे निर्माण झाल्याने आगीचे लोट दूरपर्यंत दिसत होते. आगीचे नक्की कारण काय ते समजू शकले नाही.
हा फार्म हाऊस खुप मोठा आहे. तेथे अनेक गार्ड, लोकही असतात. मात्र फार्म हाऊसमध्ये नेमकं कोण होतं., आग कोणत्या भागाला लागली आहे. याची माहिती समजू शकली नाही. लोकांनी लागलेली आग आणि धूराचे लोट पाहून अग्निशमन दलाला कळविले. त्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव ेघेतली आहे. आग आटोक्यात आणण्याचे काम अजून सुरु आहे.