Ajit Pawar | ‘अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं ते शोधून सापडणार नाही’, अजीत पवारांची टीका
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प (Budget) सादर केला. यावरुन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री (Maharashtra Finance Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्र सरकारवर (Central Government) टीका केली आहे. देशाला कररुपानं सर्वाधिक महसूल (Revenue) देणाऱ्या महाराष्ट्रावर अन्याय करण्याची परंपरा केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात कायम राखली असल्याची टीका अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे.
तसेच केंद्रानं चालू आर्थिक वर्षात एकूण 2 लाख 20 हजार कोटींचा एकूण केंद्रीय जीएसटी (GST) वसूल केला. त्यातले तब्बल 48 हजार कोटी महाराष्ट्रातून वसूल केले आहेत. या बदल्यात महाराष्ट्राला केवळ साडेपाच हजार कोटी परत केले. निधी वाटपात या अन्यायाचं प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पातही स्पष्टपणे दिसत असून अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं ते शोधूनही सापडत नसल्याची टीका अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.
अजित पवार पुढे म्हणाले, यापूर्वीच्या अर्थसंकल्पांप्रमाणे यंदाचा अर्थसंकल्पही ‘अर्थहीन’ आहे. दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या (Job) देण्याचे आश्वासन पूर्णपणे फसल्यानंतर यंदा साठ लाख नोकऱ्यांचं नवं गाजर दाखवण्यात आले आहे. एलआयसीच्या आयपीओची (LIC IPO) घोषणा ही नफ्यातील शासकीय कंपनीच्या खासगीकरणाच्या (Privatization) दिशेने टाकलेलं पाऊल असल्याचे अजित पवार म्हणाले.
हा अर्थसंकल्प पुढच्या 25 वर्षांच्या विकासाची ब्ल्यूप्रिन्ट असल्याचा दावा निरर्थक असून निवडणूक (Election) असलेल्या पाच राज्यांमधल्या जनतेची मनधरणी करण्याचा अयशस्वी प्रयत्न यामध्ये करण्यात आला आहे. संरक्षणक्षेत्राला आत्मनिर्भर करण्याची घोषणा करणाऱ्या अर्थमंत्र्यांनी मागील 8 वर्षात या दिशेनं केंद्र सरकारनं काय केलं याचं उत्तर आता तरी द्यावं.
मेक इन इंडिया (Make in India), आत्मनिर्भर भारत (Aatmanirbhar Bharat) या घोषणांप्रमाणे यंदाच्या अर्थसंकल्पातील घोषणाही हवेत विरून जातील, असा टोला अजित पवारांनी लगावला.
सध्याचे केंद्रातील सरकार हे प्रसिद्धीवर चालतं, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. केंद्र सरकारच्या एका कार्यक्रमासाठी 60-65 कॅमेऱ्यांचा सेटअप लावला जात असल्याचं आपण बघितलं आहे. या पार्श्वभूमीवर कॅमेऱ्याच्या लेन्सवरील कर कमी करण्याचा केंद्रीय अर्थमंत्र्यांचा निर्णय संयुक्तिक वाटतो असा टोला लगावताना महागाईवाढ कमी करण्यासाठी आणि रोजगारवाढीसाठी या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस घोषणा नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
Web Title :- Ajit Pawar | union budget 2022 it is impossible to find out what happened to maharashtra in the budget criticism of ajit pawar
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Station Platform Ticket | पुणेकरांना दिलासा ! प्लॅटफॉर्म तिकीट दर पुन्हा 50 रूपयांवरून 10 रूपये
Comments are closed.