Ajit Pawar | ‘जोडे मारण्याची पद्धत सुरु झाली, तर…’, सत्ताधारी आमदारांच्या कृतीवरुन अजित पवार सभागृहात आक्रमक
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी सावरकरांचा (Swatantryaveer Savarkar) अपमान केल्याचा आरोप करत भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला. दरम्यान, कामकाज सुरु होण्यापूर्वी सत्ताधारी आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी आमदारांनी केलेल्या कृतीवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांनी सभागृहात सत्ताधारी आमदारांना खडेबोल सुनावले. सत्ताधारी आमदारांनी केलेले कृत्य महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय म्हणाले अजित पवार?
विधिमंडळाच्या (Legislature) आवारात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला सत्ताधारी आमदारांकडून जोडो मारण्याचा प्रकार ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. रस्त्यावर लोक जे काही करतात तो ज्याचा-त्याचा प्रश्न असतो. मात्र विधीमंडळ कार्यक्षेत्रात असा प्रकार घडता कामा नये, अशी मागणी अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.
विधिमंडळाच्या आवारात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला सत्ताधारी आमदारांकडून जोडे मारण्याचा प्रकार झाला ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही महाराष्ट्राची परंपरा नाही.#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 23, 2023
अशा प्रकारच्या घटना कुठल्याही परिस्थितीत विधीमंडळाच्या परिसरात दोन्ही सभागृहाच्या सदस्यांकडून घडता कामा नये आणि ते घडू नये म्हणून तातडीने विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी पावले उचलली पाहिजेत असे सांगत अजित पवारांनी जोडे मारण्याच्या घटनेचा निषेध केला.
अशाप्रकारच्या घटना कुठल्याही परिस्थितीत विधिमंडळाच्या कार्य क्षेत्रात दोन्ही सभागृहाच्या सदस्यांकडून घडता कामा नये आणि ते घडू नये म्हणून विधानसभा अध्यक्षांनी व मुख्यमंत्र्यांनी तातडीनं पावलं उचलली पाहिजे.#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 23, 2023
अजित पवार पुढे म्हणाले, अधिवेशन व्यवस्थित चालावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आलो आहोत. आतापर्यंत
अधिवेशन व्यवस्थित सुरु होते. परंतु आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी एक बॅनर घेऊन बसले होते.
त्यावर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांचा फोटो होता. त्या फोटोला जोडे सत्ताधारी आमदार विधीमंडळाच्या
कार्यक्षेत्रात मारत होते. हे विधीमंडळ अध्यक्ष व सभापती यांच्या अखत्यारीत येते.
आज काँग्रेस नेत्यांबद्दल अशाप्रकारची गोष्ट सत्ताधाऱ्यांकडून घडली आहे. उद्या विरोधी पक्षाकडून देखील घडेल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
प्रत्येक पक्षाचे नेते राष्ट्रीय नेते म्हणून काम करतात. तुमच्या नेत्याचा जसा तुम्हाला अभिमान आहे तसा
आमच्या नेत्याचा आम्हाला आहे. अशी जोडे मारण्याची पद्धत विधीमंडळ आवारात सुरु झाली तर दुसऱ्या
कुणाच्या तरी फोटोला जोडे मारले तर कुणालाच आवडणार नाही आणि आम्हालाही ते पटणार नसल्याचे
अजित पवार यांनी राज्य सरकारला सुनावलं.
Web Title :- Ajit Pawar | this is not the culture of maharashtra this should not happen in the legislature ncp leader ajit pawar rahul gandhi protest
हे देखील वाचा :
IPL 2023 | यंदाच्या आयपीएलच्या नियमांत होणार मोठे बदल; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल
Comments are closed.