बारावीच्या पेपरफुटी प्रश्नी विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारवर संतापले
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | बारावीचे पेपर सुरु आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा येथे परिक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा… पेपरफुटीचे प्रकार असे वारंवार घडतायच कसे, सरकार काय झोपलय का ? असा संपप्त सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पेपरफुटी प्रश्नी सरकारला चांगलेच धारेवर धरले. अभ्यास करणाऱ्या मुलांचे हे नुकसान असून या मागे कोणत रॅकेट कार्यरत आहे का ? त्याचा तपास करुन अशा गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. (Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt)
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, बारावीचे पेपर सुरु आहेत.
आज सकाळी साडे दहा वाजताच बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली.
बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा येथे गणिताचा पेपर फुटला.
गेल्या काही दिवसात राज्यात पेपरफुटीचे प्रकार वाढले आहेत. अभ्यास करणाऱ्या मुलांवर हा अन्याय आहे.
पेपरफुटीच्या मागे कोणते रॅकेट कार्यरत आहे का ? याची सखोल चौकशी केली पाहिजे.
बारावीची परिक्षा देणाऱ्या मुलांचे हे नुकसान आहे. दोषीवर कठोर कारवाई करुन राज्यात सातत्याने सुरु असणारे असे गैरप्रकार थांबले पाहिजेत. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. (Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | How did the 12th maths paper crack before the exam…; How is this happening repeatedly in the state, is the government sleeping?
हे देखील वाचा :