मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Ajit Pawar On Karnataka CM Basavaraj Bommai | महाराष्ट्र काय तुम्हाला असा तसा वाटला का? येथील जनता हे अजिबात सहन करणार नाही. अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा चांगला समाचार घेतला आहे. (Ajit Pawar On Karnataka CM Basavaraj Bommai)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातील मराठी भाषिक प्रांत बेळगाव, कारवार निप्पाणी आणि इतर भाग आम्ही महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे म्हंटले. तसेच या सीमाप्रश्नावर 2004 पासून महाराष्ट्र शासन सर्वोच्च न्यायालयात देखील खटला लढत आहे. त्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी प्रतिक्रिया दिली होती. बोम्मई म्हणाले, आम्ही आमचा भाग तुम्हाला देण्याचा प्रश्नच येत नाही. उलट तुम्ही महाराष्ट्रातील कन्नड भाषिक अक्कलकोट आणि सोलापूरातील काही प्रांत आम्हाला दिला पाहिजे. तुम्ही जे स्वप्न पाहात आहात, ते कधीही पूर्ण होणार नाही. त्यावर अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात पवार म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानांचा आम्ही निषेध करतो. ते महाराष्ट्र मागायला निघाले आहेत का? त्यांना काय महाराष्ट्र असा तसा वाटला का? कारण नसताना त्यांनी सांगलीतील जत तालुक्यासंबंधी विधान केले. आणि आता सोलापूरातील अक्कलकोट विषयी विधाने करत आहेत. काहीही कारण नसताना अश्या प्रकारची वक्तव्ये करुन लोकांचे लक्ष विचलीत करायचा हा प्रयत्न आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना कडक शब्दांत समज दिली पाहिजे. कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि आपले उपमुख्यमंत्री दोन्ही भाजपचे आहेत. त्यांनी हा वाद निकाली काढला पाहिजे. यापूर्वी अशी मागणी होताना दिसत नव्हती. आता फक्त मुंबईची मागणी करण्याची बाकी राहिले आहे. महाराष्ट्रातील जनता हे अजिबात सहन करणार नाही. केंद्र सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करावा. तसेच सतत सांगली आणि सोलापूरचा उल्लेख करणे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी थांबविले पाहिजे, असे पवार म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यातील जनतेचे बेरोजगारी आणि महागाईवरुन लक्ष हटवण्यासाठी हा सगळा प्रकार सुरू आहे.
सीमाप्रश्नावरील प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे त्याचा निकाल येईपर्यंत कोणी काही बोलणे योग्य होणार नाही.
बेळगाव, कारवार, निप्पाणी, बिदर, भालकी हा भाग आणि सीमाभागातील 814 मराठीभाषिक गावे महाराष्ट्रात येणे हा खरा मुद्दा आहे.
ही गावे महाराष्ट्रात आल्यानंतरच संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीसाठी संपूर्ण महाराष्ट्र एकजुटीने लढेल, असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
Web Title :- Ajit Pawar On Karnataka CM Basavaraj Bommai | ncp ajit pawar on karnataka cm basavaraj somappa bommai statement over border issue bjp devendra fadnavis
हे देखील वाचा :
Aurangabad ACB Trap | गाडी सोडविण्यासाठी 5 हजारांची लाच मागणारा पोलीस अटकेत