मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Ajit Pawar On Indu Mill | आज राज्यभर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर (BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar) यांची 131 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याचनिमित्त एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी इंदू मिल स्मारकाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
इंदू मिल स्मारकाचं काम लवकरच पूर्ण होणार आहे.
निधीची (Fund) कुठल्याही प्रकारची कमतरता पडणार नाही, अशा सूचना आम्ही केल्या आहेत.
सिद्धार्थ कॉलेजसाठी (Siddhartha College) 11 कोटी 45 लाख रुपये देण्यात आले असून तिथे सुद्धा काम सुरू असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.
बाबासाहेबांनी सर्वांना लढायचं बळ दिलं असून देशाला एकजूट ठेवता आली त्यामध्ये बाबसाहेबांच्या संविधानाचा (Constitution) मोठा वाटा आहे. शिका आणि संघटित व्हा हा संदेश बाबासाहेबांनी दिला.
गरीब वंचित आणि दुर्बल घटकांसाठी ते लढले याचं श्रेय त्यांना दिलंच पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, आज चैत्यभूमी स्मारक येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विनम्र अभिवादन केले.
यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील भीमज्योतीस पुष्प अर्पण करण्यात आले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Ajit Pawar On Indu Mill | bhim jayanti 2022 ajit pawar on indu mill siddharth collage babasaheb ambedkar jayanti
हे देखील वाचा :
Gulabrao Patil On Load Shedding In Jalgaon | राज्यातील भारनियमनाला मोदी सरकार जबाबदार – शिवसेना
ST Workers Strike | 5 महिन्यांच्या संपामुळे एसटी कर्मचारी कर्जबाजारी; 250 कोटींचे नुकसान