Ajit Pawar | ‘सध्या 2 जणांचे मंत्रिमंडळ, दोघेच महाराष्ट्राचे मालक झालेत’ – अजित पवार
पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Ajit Pawar | राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील नव्या सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेण्याच्या राज्य शासनाचा (Maharashtra State Government) निर्णय लोकशाहीला मारक आहे. सध्या 2 जणांचे मंत्रिमंडळ असून दोघे जण महाराष्ट्राचे मालक झाले आहेत,’ अशी जहरी टीका अजित पवार यांनी केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुण्यातील (Pune News) धनकवडी येथील एका कार्यक्रमासाठी आले असताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “सरकार बदलल्यानंतर आम्ही काहीतरी करतोय हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. दोघे जण महाराष्ट्राचे मालक झाले असून सगळा भार यांच्या खांद्यावर आहे. आपत्ती व्यवस्थापनाला संचालक नाही. अनेकवेळा पूर, ढगफुटी अशी संकटे येतात त्यावेळी, मदत खात्याला सचिव महत्त्वाचा असतो. पण सद्य:स्थितीत सचिव नाही. हे या सरकारचे अपयश आहे. 165 आमदारांचे पाठबळ असल्याचे सांगत असताना मंत्रिमंडळाचा विस्तार का केला जात नाही?” असं अजित पवार म्हणाले.
पुढे अजित पवार म्हणाले, “महाविकास आघाडीने सत्तेत असताना गॅसवरचा कर कमी केला होता,
तेव्हा हेच लोक आमच्याकडे 50 टक्के कर माफ करण्याची मागणी करत होते.
मग आत्ता का नाही केली?, ती केली असती तर पेट्रोल 17 रुपये स्वस्त झाले असते. निर्णय घेताना पळवाट काढण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.”
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, “अडीच वर्षात आम्ही कधीही कोणाचा ध्वनिक्षेपक खेचला नाही, ही तर सुरुवात आहे.
आत्तापासून ओढा-ओढी असेल तर महाराष्ट्राचे कसे होईल?” असा सवाल त्यांनी केला.
त्याचबरोबर ‘दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) विधानं करताना ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असे करू नये.”,
असं सांगत “राष्ट्रपतिपदासाठी पाठिंबा देणे हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असून तो त्यांचा अधिकार असल्याचं,’ अजित पवार म्हणाले.
Web Title :- Ajit Pawar | now there is a cabinet of two and both have become the boss of maharashtra ncp leader ajit pawar
हे देखील वाचा :
Pune Rains Update | पुण्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
Comments are closed.