Ajit Pawar NCP Vs Shivsena UBT | अजित पवारांच्या आमदाराला शह देण्यासाठी ठाकरेंच्या शिलेदाराने कसली कंबर
खेड: Ajit Pawar NCP Vs Shivsena UBT | राज्यात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झालेली आहे. दरम्यान खेड-आळंदी विधानसभा (Khed Alandi Assembly Election) मतदारसंघ मविआत (Mahavikas Aghadi) कोणाकडे जाणार याची चर्चा सुरु आहे. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप मोहिते (Dilip Mohite Patil) विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे ही जागा मविआ मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला (Sharad Pawar NCP) सुटेल अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु असल्याची दिसते.
मात्र, आता ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांकडून दावेदारी सुरु झाल्यामुळे ही जागा पवार गट लढवणार की ठाकरे गट हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे अमोल पवार (Amol Pawar) ही जागा लढवण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अमोल पवार यांचे सर्वच पक्षातील खेड तालुक्यातील नेत्यांशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमुळे सर्व विरोधक एकत्र येऊन विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांना चांगली टक्कर देऊ शकतात.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून अतुल देशमुख, सुधीर मुंगसे आणि रामदास ठाकूर हे इच्छुक आहेत तर शिवसेना ठाकरे पक्षाकडून जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, अमोल पवार, शिवाजी वर्पे, बाबाजी काळे, रामदास धनवटे, विजया शिंदे, संजूभाऊ घनवट असे इच्छुक आहेत.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत स्व. सुरेश गोरे यांच्या रुपाने खेड तालुक्याला शिवसेनेचा पहिला आमदार मिळाला होता. गेल्या पाच विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहता, २०१४ चा अपवाद वगळता इथे शिवसेनेचा उमेदवार नेहमीच दोन नंबरला राहिला आहे.
खेड आळंदी विधानसभेत शिवसेनेची ताकद मोठी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांचे कट्टर विरोधक, मा. उपसभापती व खेड आळंदी विधानसभा निवडणूक समन्वयक अमोल पवार यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना झाला आहे. विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी देखील पहिली विधानसभा निवडणूक शिवसेना पक्षाकडूनच लढवली होती. माजी आमदार स्व. नारायण पवार हे देखील शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून एका निवडणुकीला सामोरे गेले होते. तर स्व. सुरेश गोरे हे देखील या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत.
Comments are closed.