Ajit Pawar | ‘पंतप्रधानांना सांगितले तरीही…’ ‘भटकती आत्मा’ मुळेच फटका; शरद पवारांवरील टीकेवर अजित पवार म्हणाले…
नाशिक: Ajit Pawar | लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले. अजित पवार काही आमदारांना घेऊन महायुतीत (Mahayuti) सहभागी झाले. दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. अजित पवार गटाची (Ajit Pawar NCP) अवघी एक जागा निवडून आली तर शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) १० पैकी ८ खासदार निवडून आले.
लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) तयारी सुरु झालेली आहे. नाशिक येथून राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा (Jan Sanman Yatra) सुरु झालेली आहे. दरम्यान हा पक्षाच्या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे.
लोकसभा निवडणुकीत पुण्यात प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शरद पवार यांना उद्देशून ‘भटकती आत्मा’ (Bhatakati Atma Remark) म्हंटले होते. पंतप्रधानांच्या या टिकेवरून देशभरातून त्यांच्यावर टीका झाली. तसेच या टीकेचा बारामतीसह इतर लोकसभा मतदारसंघावर याचा परिणाम दिसून आला.
या सर्व घडामोडीवर अजित पवार यांनी नाशिक येथे बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पुण्यातील सभेत शरद पवार यांच्या विरोधात बोलू नये अशी विनंती पंतप्रधान मोदी यांना केली होती. परंतु त्यांनी त्यांचा उल्लेख ‘भटकती आत्मा’ केला आणि त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला, असे अजित पवार म्हणाले.
पुण्यात महायुतीच्या पुणे, बारामती, मावळ आणि शिरूरच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. पंतप्रधानांची सभा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलायला उठले, तेव्हा दुसऱ्या खुर्चीत बसलेले अजित पवार पटकन मोदींच्या जवळ गेले आणि काहीतरी बोलताना दिसले. या संवादादरम्यान अजित पवारांनी मोदींना सांगितले की, पुणे आणि आसपासच्या चार लोकसभा मतदारसंघात आणि स्थानिक राजकारणात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे त्यांचावर टीका करू नका.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे अनेक मतदारसंघात यामुळे फटका बसल्याचे राजकीय जाणकार सांगतात. “महाराष्ट्रातील काही भटकत्या आत्म्यांनी आपल्या महत्त्वाकांक्षेमुळे ४५ वर्षांपूर्वी राजकीय अस्थिरतेचे युग सुरू केले.” यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनी १९७८ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या विरोधात केलेल्या बंडाचा संदर्भ दिला होता.
पंतप्रधान पुढे म्हणाले होते की, “१९९५ मध्ये शिवसेना-भाजप सरकार सत्तेवर आले तेव्हाही ‘भटकती आत्मा’ सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत होती. २०१९ मध्ये त्यांनी तत्कालीन सरकारला अस्थिर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. महाराष्ट्रानंतर आता ते देश अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा ‘भटकत्या आत्म्या’ पासून महाराष्ट्राचे रक्षण करण्याची गरज आहे.” अशी टीका मोदी यांनी केली होती.
Comments are closed.