Ajit Pawar NCP | ‘सुंदर मुलगी नोकरीवाल्याला, तीन नंबरचा गाळ शेतकऱ्याचा मुलाला…’; राष्ट्रवादी अजित पवारांच्या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
अमरावती: Ajit Pawar NCP | राज्यात विधानसभेची (Maharashtra Assembly Election 2024) जोरदार तयारी सुरु आहे. महायुती सरकारने (Mahayuti Govt) लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) घोषणा केली आहे ज्याने अनेक महिला या योजनेकडे आकर्षित झाल्या आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी विधानसभेसाठी रणनीती आखत पिंक पॉलिटिक्सचा (Pink Politics) वापर केला आहे. लाडकी बहीण योजनेचा प्रचार स्वतः ते करताना दिसत आहेत. त्यातच आता त्यांच्या आमदाराने केलेल्या विधानाने अजित पवार कोंडीत सापडले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघाचे (Morshi Assembly Constituency) आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ‘मुलगी जर पाहायला चांगली असेल तर तिला पोरगा गोरा पाहिजे, मुलगी स्मार्ट पाहिजे असेल, एक नंबर देखणी असेल तर ती तुमच्या माझ्या सारख्याला भेटत नाही, ती नोकरीवाल्या मुलाला भेटते, दोन नंबरची मुलगी पानटपरी वाल्याला, किराणा दुकानदाराला भेटते,’ असे खळबळजनक विधान देवेंद्र भुयार यांनी केले आहे.
तसेच ‘तीन नंबरचा राहिलेला गाळ, हेबडली हाबडलेली मुलगी शेतकऱ्याच्या पोट्टयाला मिळते, म्हणजे शेतकऱ्यांच्या पोराचं खरं राहिलं नाही.. माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी वानराचे पिल्लू असाच कार्यक्रम आहे सगळा,’ अशी भाषा भुयार यांनी वापरली.
त्यावरून आता विरोधकांनी या विधानावर टीका केली आहे. “देवेंद्र भुयार यांनी केलेला वाह्यापणा फक्त महिलांचा अपमान नाही तर शेतामध्ये राबणाऱ्या भूमीपुत्रांची टिंगल उडवण्याचा प्रकार आहे. कृषीक्षेत्राला कमी लेखने, अनास्था करणे आणि शेतीसंबंधित लोकांची अवहेलना करण्याचा हा प्रकार आहे. आपण काहीही वाह्यातपणा केला, हीन वक्तव्ये केली तरी आपल्यावर कारवाई होणार नाही, याची खात्री अजित पवार गट तसेच शिंदे समर्थक आमदारांना आहे”, असे म्हणत सुषमा अंधारेंनीही निशाणा साधला आहे.
काँग्रेसच्या महिला आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी संताप व्यक्त केला आहे. मला आश्चर्य वाटते ज्या ठिकाणी अजित पवार यांचा लाडक्या बहिणीचा कार्यक्रम होतो आणि त्याच ठिकाणच्या आमदारांचा महिलांकडे बघण्याचा वाईट दृष्टिकोन आहे. अजित पवार आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं, अशा प्रकारचे महिलांचा वर्गीकरण कोणीही खपून घेणार नाही, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.
Comments are closed.