Ajit Pawar | “लोकांचे लक्ष बेरोजगारी आणि महागाई पासून हटवण्यासाठी संपूर्ण वाद’ – अजित पवार

Ajit Pawar | ajit pawar first reaction on anil deshmukh released from jail

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन Ajit Pawar | महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. या वादात महाराष्ट्र सरकारच्या बाजूने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार उतरले आहेत. हा संपूर्ण वाद लोकांचे लक्ष बेरोजगारी आणि महागाई पासून हटवण्यासाठी सुरू करण्यात आला असून, ते काय आता संपूर्ण महाराष्ट्र मागणार आहेत का? महाराष्ट्र तुम्हाला असा तसा वाटला का? अशा शब्दात त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना सुनावले आहे. (Ajit Pawar)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा सांगण्याचा विचार कर्नाटक गांभीर्याने करत आहे, असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केल्यानंतर हा वाद सुरू झाला. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी या विधानाची टीका केली होती. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून, बेळगाव, कारवार आणि निप्पाणी हे मराठी भाषिक भाग आम्ही महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. (Ajit Pawar)

 

त्याला उत्तर म्हणून, तुमची स्वप्ने कधीही पूर्ण होणार नाहीत, असे म्हणत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान करणारे ट्विट केले. “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या मुद्द्यावर चिथावणीखोर विधान केलं असून, त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. राज्याच्या जमीन, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे,” असे ते या ट्विटमध्ये म्हणाले.

 

या संबंधित बोलताना अजित पवार म्हणाले, “काही संबंध नसताना अशा प्रकारची वक्तव्यं करून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बोम्मई यांना कडक शब्दांत समज दिली पाहिजे. शेवटी, कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि आपले उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत”.

 

 

“याआधी अशी विधानं होताना दिसत नव्हती. आता तर फक्त मुंबईच मागायची राहिली आहे. महाराष्ट्रातील जनता अशी वक्तव्य अजिबात सहन करणार नाही. त्यांनी अशी वक्तव्यं करण्याच्या भानगडीत पडू नये. केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. तिथे आपापली भूमिका मांडल्यानंतर निर्णय होईल. पण असा सतत सांगली, सोलापूरचा उल्लेख कऱणं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी थांबवलं पाहिजे,” असा इशाराच अजित पवारांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना दिला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

“हा सगळा कार्यक्रम बेरोजगारी आणि महागाईवरुन लोकांचे लक्ष हटवण्यासाठी सुरू आहे.
अशा प्रकारची विधाने केली म्हणजे मीडिया तेच दाखवते.
राज्याच्या अस्मितेचा, एकतेचा प्रश्न असल्याने सर्वांनी बोललं पाहिजे.
पण आता कारण नसताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी असे विधान केल्याने त्यांच्या अंगात काय संचारले आहे,
हे तपासण्याची वेळ आली आहे,” असा संताप व्यक्त करत, “जत आणि अक्कलकोट तालुक्यातील गावांवरचा दावा त्यांच्यासाठी ‘खयाली पुलाव’ठरेल.
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातली 814 मराठीभाषक गावं महाराष्ट्रात येणं हा खरा प्रश्न आहे.
ही गावं महाराष्ट्रात आल्यानंतरच संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल.
संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीसाठी संपूर्ण महाराष्ट्र एकजुटीने लढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | NCP Leader On Maharashtra Karnataka Border Issu Karnataka CM Basavaraj Bommai

 

हे देखील वाचा :

Udayanraje Bhonsle | बुद्धी भ्रष्ट झालीये काय? कोश्यारींना पदावरुन मुक्त करा, उदयनराजेंचा आक्रमक पवित्रा

Ajit Pawar On Karnataka CM Basavaraj Bommai | कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र काय असा तसा वाटला का?; अजित पवारांचे टिकास्त्र

Abhijeet Sawant – Indian Idol Show | ‘छोटे छोटे कार्यक्रम करून फीसाठी जमवायचो पैसे’ ! अभिजित सावंतने सांगितला ‘इंडियन आयडल’पर्यंतचा त्याचा संपूर्ण प्रवास