Ajit Pawar NCP | अजित पवारांची डोकेदुखी वाढणार; आमदार झिरवळांचे पुत्र शरद पवार गटाच्या मेळाव्याला उपस्थित
पुणे : Ajit Pawar NCP | लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा फटका बसला त्यानंतर आता आगामी विधासभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून पक्षाने तयारी सुरु केलेली आहे. मात्र ही तयारी सुरु असताना अजित पवारांना एकामागून एक धक्के बसत आहेत. अजित पवार गटातून अनेक पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करताना दिसत आहेत.
कारण राष्ट्रवादीचे दिंडोरी विधानसभेचे (Dindori Assembly Constituency) आमदार असलेले नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांचे पुत्र गोकुळ झिरवळ (Gokul Narhari Zirwal) हे आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आयोजित केलेल्या निष्ठावान संवाद मेळाव्यास उपस्थित राहिले आहेत. तसेच माझी निष्ठा शरद पवार यांच्यावर असल्याचंही गोकुळ झिरवळ यांनी स्पष्ट केले आहे.
गोकुळ झिरवळ म्हणाले, ” आम्ही लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना निवडून आणले. कार्यकर्त्यांची इच्छा होती की, आपण भास्कर भगरे यांच्याबरोबर राहायला हवे. त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला होता. माझ्या वडिलांची निष्ठा अजित पवारांवर आहे. कुटुंब व्यवस्था वेगळी आणि राजकारण वेगळं आहे. त्यांची अजित पवार यांच्यावर आणि माझी शरद पवार यांच्यावर निष्ठा आहे. मात्र माझ्या वडिलांनीही आता शरद पवार यांच्याकडे यावं,” अशी साद गोकुळ झिरवळ यांनी घातली आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नरहरी झिरवळ अजित पवारांसोबत गेले होते मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांचा प्रचार केला. त्यामुळे आगामी काळात नरहरी झिरवळ शरद पवार गटात येतील अशी राजकीय वर्तुळात कुजबुज आहे.
Comments are closed.