अजित पवार पुढे म्हणाले, ज्यांच्या नेतृत्वाखालील बँकेत सतीश सावंत (Satish Sawant) काम करत होते ते काय काय काम सांगत होते हे जिल्ह्याला माहित आहे. संस्था उभ्या करायला डोके आणि अक्कल लागते, पण बंद करायलाय अक्कल लागत नाही, असा टोला अजित पवार (Ajit Pawar) यांनी नारायण राणे यांना लगावला. खासदार (MP), आमदार (MLA) होणे सोपे पण बँकेची निवडणूक (Bank Election) लढवणे अवघड आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक (Sindhudurg District Bank) राज्यात अग्रेसर असून याठिकाणी स्पर्धा मोठी असल्याचे पवार यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
विरोधकांचे राजकीय पाठबळ कसे आहे ते पहा. दादागिरी दहशतीला घाबरु नका, असे म्हणत त्यांनी नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. कर्ज कसे थकवले हे सभासदांनी बघावे. बँकेत चुकीचे वागून चालणार नाही. परंतु निवडणुकीत गाफिल राहू नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले. योग्य व्यक्तीच्या हातात बँक द्या. अन्यथा उस्मानाबाद, नांदेड, बीड सारखी अवस्था सिंधुदुर्ग बँकेची होईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
कोणत्याही परिस्थितीत बँक जिंकायची
केंद्र सरकारची (Central Government) राज्यातील सहकार खात्यावर वक्रदृष्टी आहे. शरद पवार यांचा आदर्श घेऊन सहकारमध्ये काम केले पाहिजे, असं मत विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी व्यक्त केले. कुठल्याही परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा बँक जिकायची आहे. बँकेवर महाविकास आघाडीचेच पॅनेल येईल असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
Web Title :- Ajit Pawar | maharashtra deputy cm ajit pawar slams bjp Narayan Rane over co operative banks election sindhudurga