मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानी इन्कम टॅक्स विभागाने धाड टाकली आहे. अशी माहिती समोर येते आहे. यावरुन आता अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं समजते. भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी नुकतंच जरंडेश्वर कारखान्यावरुन (Jarandeshwar Factory) अजित पवारांना लक्ष केलं होतं. याच्या गंभीर आरोपावरुन राज्यात खळबळ उडाली आहे. त्यातच आज (गुरुवारी) आयकर विभागाने (Income Tax Department) पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरी छापेमारी (Raid) केली आहे.
किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि ठाकरे सरकारवर निशाणा साधला. तसेच जरंडेश्वर कारखान्यावरुन अजित पवारांना सोमय्यांनी लक्ष केलं आहे. सोमय्यांनी बारामती दौरा केल्यानंतर आज लगेच आयकर विभागाकडुन छापेमारी केली जात आहे. यावरुन तर्कवितर्काना उधान आलं आहे. आता, अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याची चर्चा आहे. कारण आयकर विभागाची छापेमारी संचालकांच्या घरी सुरू असल्याचे समजते. दौंड शुगर, आंबलीक शुगर, जरंडेश्वर साखर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे हे सर्व साखर कारखाने अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीयांचे आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीसह तालुक्यातील काटेवाडी येथे आज सकळपासून केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी सुरु आहे. आयकर विभागाकडून ही छापेमारी सुरु असल्याचे बोलले जात आहे.
नगर जिल्ह्यातील एका खासगी कारखान्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या निकटवर्तीयाची या पथकाकडून चौकशी केली जाते. दुसरीकडे बारामती एमआयडीसीतील (Baramati MIDC) एका आंतरराष्ट्रीय कंपनीत एक पथक पोहोचले असल्याचं समजते.
दरम्यान, पोलीस यंत्रणेला कल्पना न देता सीआरपीएफच्या जवानांच्या मदतीनं ही कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Web Title :- Ajit Pawar | Income tax department raids the house of Ajit Pawar’s close associates; Increased difficulty in Deputy CM?
Pune News | महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो तरच आमची जास्त ‘ताकद’ – जयंत पाटील