• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Ajit Pawar In Pune | अजित पवारांनी ‘विकासाच्या’ मुद्द्याला हात घालत आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची दिशा केली स्पष्ट

by nageshsuryavanshi
March 15, 2022
in ताज्या बातम्या, पुणे, राजकीय
0
Ajit Pawar | ajit pawar on sharad pawar pm narendra modi meeting

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Ajit Pawar In Pune | उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजकीय टीका टिपण्णी टाळून ‘विकासाच्या’ मुद्द्याला हात घालत आगामी महापालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Elections 2022) प्रचाराची दिशा स्पष्ट केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मागील पाच वर्षातील विकासाचे मुद्दे केंद्रस्थानी ठेवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Ajit Pawar In Pune)

नागरिकांच्या रस्ते, पाणी, ड्रेनेज, प्राथमिक आरोग्य, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक यासारख्या मूलभूत गरजा महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. विशेष असे की साक्षरता आणि सामाजिक भान असलेल्या पुण्यासारख्या शहरात नागरिक अधिक जागरूक असतात. त्यामुळेच लोकसभा, विधानसभा या सारख्या निवडणुका आणि महापालिका निवडणुकी मध्ये नागरिकांचा प्राधान्यक्रम हा दैनंदिन सुविधांना अधिक राहतो. (Ajit Pawar In Pune)

मागील 30 वर्षांत प्रामुख्याने जागतिकीकरण आणि संगणक युगानंतर नागरी सुविधांचा ट्रेंड हा बदलत गेला आहे. औद्योगिक नगरी पुण्याची भरभराट खऱ्या अर्थाने त्यानंतर झाली.
मागील तीस वर्षात ज्या वेगाने पुण्यातील शहरीकरण आणि सीमा वाढल्या त्यातुलनेत पायाभूत सुविधा निर्माण करणे हे प्रत्येक सत्ताधाऱ्यांपुढे आव्हान राहिले आहे. पूण्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरातील मोठ्या शहरांमध्ये ही परिस्थिती कमी अधिक फरकाने सातत्याने पाहायला मिळत असते. परंतु यानंतरही केंद्र आणि राज्यातील सत्तेचा वापर करून प्रत्येक शहरात सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु यानंतरही कालानुरूप बदलत्या सुविधांच्या अपेक्षांचे ओझे हे कायमच राहिले आहे.

शहरांच्या विकासाची उदाहरणे द्यायची झाल्यास पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबईचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. प्रामुख्याने रस्त्यांचा दर्जेदार विकास, कचरा व्यवस्थापन व नवी मुंबईचा सुनियोजित विकास ही उदाहरणे कायम दिली जातात. 2017 पूर्वी पर्यंत दहा वर्षे पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई या महापालिकांमध्ये साधारण दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस ची सत्ता होती. त्याअगोदर काँग्रेस सत्तेत होती. तर मागील पाच वर्षात भाजपने एकहाती सत्ता मिळवली.

केंद्रात सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवलेल्या भाजप ला 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी मध्ये पुणे , पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यामध्ये 2014 प्रमाणे अभूतपूर्व यश मिळाले नाही. या दोन्ही निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस ने पुनरागमन केले. याला शरद पवार आणि धडाकेबाज निर्णय घेणारे आणि विकासाचा झपाटा असलेले अजित पवार यांचे नेतृत्व कारणीभूत ठरले. भाजपने पवार कुटुंबियांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतरही जनतेने दोन सत्तांमधील फरक अधोरेखित करत राष्ट्रवादीच्या पारड्यात झुकते माप टाकले.

यामुळेच सध्या विरोधी पक्ष भाजपने महाविकास आघाडी सरकार आणि पुण्यात विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबियावर आरोपांच्या फैरी सुरू केल्या असल्या तरी अजित पवार यांनी त्याला प्रत्युत्तर देणे टाळले आहे. कोरोना काळात सातत्याने आढावा बैठका आणि महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन महत्वाची भुमिका पार पाडली.
महापालिकेकडून येणारे प्रस्ताव विनाविलंब मंजूर केले. राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये न रमता विकासात्मक आणि रचनात्मक कामांवर अधिक भर दिला आहे, हाच टेम्पो अजित पवार पुढे घेऊन चालले आहेत, हे रविवारी त्यांनी शहरात विविध ठिकाणी झालेल्या 30 कार्यक्रमांमध्ये प्रकर्षाने दिसून आले.

अगदी सकाळी 7 वाजता सुस म्हाळुंगे येथील विकास कामाच्या उद्घाटनापासून वारजे, आंबेगाव, सुखसागरनगर, कोंढवा, वानवडी, हडपसर, खराडी, धानोरी, रात्री नऊ वाजेपर्यंत विश्रांतवाडी येथील विकासकामांचे उदघाटनाचे 30 कार्यक्रम केले. नियोजनामध्ये भाषणाचा कार्यक्रम धानोरीतील एक सभा वगळून कुठेच नव्हते. परंतु प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी नगरसेवकांनी सभेची व्यवस्था केली होती. त्याठिकाणी अजित पवार यांनी आवर्जून छोटेखानी भाषण करताना विकासाचा मुद्दाच केंद्रस्थानी होता. विरोधी पक्ष भाजपवर टिकाटिपण्णी केली नाही. यातूनच अजित पवार यांनी आगामी निवडणुकीसाठीची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची (NCP) दिशा स्पष्ट केल्याचे दिसून येत आहे.

Web Title :- Ajit Pawar In Pune | Ajit Pawar touched on the issue of development and directed the campaign for the forthcoming pune municipal elections

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Pune Crime | पहिल्या पतीपासूनच्या मुलांना पैसे पाठविण्याच्या कारणावरुन पत्नीचा डोक्यात दगड घालून खून; लोणी काळभोर परिसरातील घटना

Pune Crime | येरवड्यात तडीपार गुंडाकडून घरात घुसून 21 वर्षीय तरूणीचा विनयभंग; पिडीतेच्या आईला अश्लिल भाषेत शिवीगाळ

Pune Crime | ‘अ‍ॅन्टी करप्शन’ अशी बतावणी करुन सराफाच्या कामगाराला 17 लाखाला लुटले; स्वारगेट येथील वेगा सेंटरजवळील घटना

Tags: Ajit Pawar In PuneAjit Pawar In Pune latest newsAjit Pawar In Pune latest news todayAjit Pawar In Pune marathi newsAjit Pawar In Pune news today marathiAmbegaonAssembly ElectionsBJPCorruptionDeputy Chief Minister Ajit Pawardevelopment workdhanoriDrainageguardian minister ajit pawarHadapsarIndustrialKharadiKondhwalatest Ajit Pawar In Punelatest marathi newslatest news on Ajit Pawar In PuneLok Sabha electionsMahavikas Aghadi Governmentmarathi Ajit Pawar In Pune newsmunicipal electionsNavi MumbaiNCPpcmcPimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC)pimpri-chinchwadPMCPMC ElectionsPrimary Healthpublic transportpunePune Municipal Corporation PMCPune Municipal Elections 2022Pune PoliticsroadsSukhsagarnagarSus- Mahalungetoday’s Ajit Pawar In Pune newsVishrantwadiWanwadiwarjewaste managementwaterआंबेगावआगामी महापालिका निवडणुकउपमुख्यमंत्री अजित पवारऔद्योगिककचरा व्यवस्थापनकोंढवाखराडीड्रेनेजधानोरीनवी मुंबईपाणीपालकमंत्री अजित पवारपिंपरी चिचंवडपुणेपुणे महापालिका निवडणुक 2022प्राथमिक आरोग्यभाजपभ्रष्टाचारमहापालिका निवडणुकमहाविकास आघाडी सरकाररस्तेराष्ट्रवादी काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलोकसभा निवडणुकवानवडीवारजेविकासकामांचे उदघाटनविधानसभा निवडणुकविश्रांतवाडीसार्वजनिक वाहतूकसुखसागरनगरसुस- म्हाळुंगेहडपसर
Previous Post

Pune Crime | पहिल्या पतीपासूनच्या मुलांना पैसे पाठविण्याच्या कारणावरुन पत्नीचा डोक्यात दगड घालून खून; लोणी काळभोर परिसरातील घटना

Next Post

Side Effect Of Feeder Milk And Sipper Cup | तुमचं बाळ प्लॅस्टिकच्या बाटलीतून दूध पित असेल तर सावधान; जाणून घ्या ‘हे’ भयानक सत्य

Next Post
Side Effect Of Feeder Milk And Sipper Cup | side effect of feeder milk and sipper cup on your baby health sore throat bisphenol a harmful chemical

Side Effect Of Feeder Milk And Sipper Cup | तुमचं बाळ प्लॅस्टिकच्या बाटलीतून दूध पित असेल तर सावधान; जाणून घ्या 'हे' भयानक सत्य

Maharashtra Political Crisis | cm uddhav thackeray resign from his post Maharashtra Political Crisis
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा दिला

June 29, 2022
0

मुंबई : बहुजननामा  ऑनलाइन - Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे...

Read more
Maharashtra Political Crisis | Floor test majority test will be held tomorrow supreme court order maharashtra political crisis

Maharashtra Political Crisis | ठाकरे सरकारला ‘सुप्रीम’ धक्का ! उद्याच होणार बहुमत चाचणी; जाणून घ्या सुप्रीम कोर्टात नेमका काय झाला युक्तीवाद

June 29, 2022
Jayant Patil | was this your last cabinet ncp leader and minister jayant patil spoke clearly on the question of the journalist

Jayant Patil | ही तुमची शेवटची कॅबिनेट होती का ? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले…

June 29, 2022
CM Uddhav Thackeray | thank you for cooperating with me chief minister uddhav thackerays last speech in the cabinet

CM Uddhav Thackeray | ‘मला माझ्याच लोकांनी दगा दिला, सहकार्याबद्दल धन्यवाद’; CM उद्धव ठाकरेंनी मानले आभार

June 29, 2022
Maharashtra Cabinet Meeting | approval to rename sambhajinagar of aurangabad and osmanabad as dharashiv in cabinet meeting thackeray government

Maharashtra Cabinet Meeting | औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर, मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजूरी

June 29, 2022
Shivsena | otherwise you will not be able to smile at the rebellious mlas of guwahati by shahaji patil

Shivsena | एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून शरद पवारांविरुद्ध तुफान फटकेबाजी

June 29, 2022
Mukesh Ambani Succession Plan | mukesh ambani succession plan reliance industries retail telecom petrochemical green energy business

Mukesh Ambani Succession Plan | 3 मुलांमध्ये आपल्या उद्योगाची अशी विभागणी करणार मुकेश अंबानी, मुलीनंतर आता मुलावर जबाबदारी

June 29, 2022
Benefits Of Home Exercise | exercise to loose or reduce belly fat

Benefits Of Home Exercise | पोटाची चरबी कमी करायचीय?; मग जिमला जाण्यापेक्षा घरच्या घरीच करा एक्सरसाईज, होईल फायदा

June 29, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch SS Cell Raids On Gambling Den Of Appa Kumbhar Samarth Police Station Barne Road

Pune Crime | कारवाई केल्यानंतरही अप्पा कुंभारचे जुगार अड्डे सुरुच असल्याचे उघड; बारणे रोडवरील जुगार अड्ड्यावर छापा

June 29, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

chhatarpur-rape-case-muslim-boy-rapes-2-minor-girls-way-temple-tension-grips-area
क्राईम

‘डान्स’ शिक्षक रोमियो गोडबोले ‘गोत्यात’; दारू पाजून 22 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

March 31, 2021
0

...

Read more

Maharashtra Political Crisis | ठाकरे सरकार अल्पमतात; शिंदे गटाचे राज्यपालांना पत्र ?

3 days ago

ED Summons Sanjay Raut | शिवसेनेला आणखी एक धक्का ! संजय राऊतांना ईडीचे समन्स

3 days ago

Chandrakant Patil | ‘महापूजा करायला कोणते मुख्यमंत्री येणार हे विठुमाउलींनाच ठाऊक’ – चंद्रकांत पाटील

7 days ago

Sandeep Deshpande | ‘स्क्रीप्ट ठरली, कुठे आणून ठेवली बाळासाहेबांची शिवसेना ?’, मनसेची शिवसेनेवर टीका

17 hours ago

Yoga For Growing Children | योगासनांमुळे मुलांच्या निरोगी विकासास मदत होईल, त्याच्या सरावाची सवय नक्की लावा

2 days ago

Nana Patole On Ajit Pawar | काँग्रेसचा उप मुख्यमंत्र्यांवर मोठा आरोप, म्हणाले – ‘अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना त्रास द्यायचे’

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat