पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Ajit Pawar In Patrakar Sangh Pune | अलीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. यापुढील काळात पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाही, असा इशारा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी दिला. (Ajit Pawar In Patrakar Sangh Pune)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ज्येष्ठ पत्रकार शामराव दौंडकर (Shyam Daundkar) यांनी लिहिलेल्या ‘धडपड’ या पुस्तकाचे प्रकाशन अजित पवार यांच्या हस्ते झाले. पत्रकार भवन येथे झालेल्या या कार्यक्रमास अॅड. अमरसिंह जाधवराव, ज्ञानेश्वर भोईटे, पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, चंद्रकांत भुजबळ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. (Ajit Pawar In Patrakar Sangh Pune)
अजित पवार म्हणाले अलीकडच्या काळात माध्यमावर हल्ले वाढले आहेत. श्रमिक पत्रकार संघाला वेगळं वलय आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चवथा स्तंभ आहे. या चवथ्या स्तंभावर जाणीवपूर्वक हल्ले सुरू आहेत. ही परंपरा महाराष्ट्राला शोभणारी नाही. कोकणात पत्रकाराची हत्या झाली. मागील आठवड्यात एका पत्रकाराला मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ता दम देतात. छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये खोके यावरून रॅप सॉंग करणाऱ्याला जेल मध्ये टाकले. खोका हा उल्लेख केला, त्याला अटक करून संबंधितांनी खोक्याचे एकप्रकारे समर्थन केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केला जात आहे. एक नेता सातत्याने HMV पत्रकार, चाय बिस्कीट पत्रकार अशी जाहीर वलग्ना करत आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये पत्रकाराला शाई फेकीच्या गुन्ह्यात गोवले गेले. पत्रकारांनी एकजूट केल्यावर त्या पत्रकाराला गुन्ह्यातुन वगळले गेले. सुसुंकृत महाराष्ट्रात हा प्रकार एक शोकांतिका आहे. असे हिणकस प्रकार थांबले पाहिजेत. यासाठी सगळ्यांनी एकजूट करण्याची गरज आहे. म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकावता कामा नये. यापुढे पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाही.
पुस्तकाबाबत बोलताना पवार म्हणाले शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या लोकांची गाथा धडपड मधून मांडली आहे. मी 32 वर्षांपासून राजकीय जीवनात असून तेंव्हापासून तात्या या क्षेत्रात आहे. विविध क्षेत्रातील व्यक्तींचे अल्पचरित्रातून मांडल्याने पुस्तक वाचनीय झाले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अशा बातम्यांनी मनाला वेदना होतात
अलीकडे माहिती न घेता ज्या बातम्या येतात त्यामुळे मनाला वेदना होतात.
तब्येत बरी नसल्याने विश्रांती घ्यावी लागते. परंतु ध चा मा केला जातो,
त्यामुळे मनाला वेदना झाल्या असे स्पष्टीकरण देखील अजित पवार यांनी शुक्रवारी
त्यांचा फोन ‘नॉट रीचेबल ‘ झाल्यानंतर आलेल्या बातम्यां संदर्भात केले.
Web Title : Ajit Pawar In Patrakar Sangh Pune | Attacks on journalists will no longer be tolerated: Ajit Pawar
हे देखील वाचा :