बारामती : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री (Pune Guardian Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजकीय पक्षातील नेत्यांना (Political Party Leaders) सल्ला दिला आहे. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, अरे बाबांनो, वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनो आज आपल्या राज्यात, देशात जे प्रश्न आहेत त्याला आपण महत्त्व देऊ, ते कसे सोडवता येतील ते पाहू. का उगीच जुन्या कुठल्या विषयांमध्ये लोकांना घेऊन त्यांच्या भावना भडकवता येतील, संभ्रमावस्था कशी निर्माण करता येईल हे पाहण्याचं काम नाही. प्रसारमाध्यमांनी देखील हे कमी करावं आणि विकासाच्या कामांना (Development Works) महत्त्व द्यावे, अशा शब्दांत त्यांनी नेत्यांना सल्ला दिला.
अजित पवार (Ajit Pawar) बारामती येथे रविवारी (दि.17) विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना राजकीय पक्षांच्या नेत्यांना सल्ला दिला.
अजित पवार म्हणाले, दिल्लीमध्ये हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) मिरवणुकीमध्ये रात्री काही अपप्रकार घडले हे आपल्यासुद्धा पाहण्यात आले असेल. सर्व जाती (Caste) धर्माच्या (Religion) लोकांनी आपआपले सण आनंदाने, उत्साहाने साजरे केले पाहिजेत. एकोप्याने राहिले पाहिजे. जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण होईल असे वर्तन कोणाकडून होऊ नये. संविधानामुळेच (Constitution) आपला देश एकसंघ असल्याचे आपल्याला बघायला मिळते. आज आजूबाजूच्या देशांची काय अवस्था आहे. असे असताना आपला एवढा मोठा खंडप्राय देश केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या दुरदृष्टीमुळे व संविधानामुळे एकसंघ राहिला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
माझ्या नावाने पावत्या फाडू नका
यावेळी अजित पवार यांना जेम्स लेनने (James Lane) केलेल्या विधानाबाबत विचारले असता ते म्हणाले, मी याबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही.
तुम्ही कारण नसताना माझ्या नावाने पावत्या फाडू नका.
सध्याच्या विकासाच्या कामांना आणि राज्यासमोर, देशासमोर असणाऱ्या प्रश्नांना महत्व द्या असा सल्ला त्यांनी दिला.
Web Title :- Ajit Pawar | how political party leaders provoke people give importance to development works advice of ajit pawar
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- Pune Crime | अनैतिक संबंधातून जन्म झाल्याच्या संशयावरुन बापानेच केला 3 वर्षाच्या ‘मुस्कान’ चा खून, आंबेगाव बुद्रुक परिसरातील घटना
- Rupali Patil | ‘कायदा हातात घेतल्यावर कारवाई होणार, राज ठाकरेंनी…”; रूपाली पाटील यांचा मनसेवर निशाणा !
- Supreme Court On Hawkers | ‘फेरीवाल्यांना रात्री रस्त्यावर साहित्य ठेवण्याचा हक्क नाही’ – सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा