Ajit Pawar | अजित पवार यांच्या उपस्थितीत 10 जुलैला गुरुजन गौरव सोहळा

पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Ajit Pawar | राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (NCP) आणि चिंतामणी ज्ञानपीठच्या संयुक्त विद्यमाने होणारा गुरूजन गौरव समारंभ (Gurujan Gaurav Samarambh) रविवारी (10 जुलै) राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होईल. गुरूजन गौरव समारंभाचे हे 17 वे वर्ष आहे, अशी माहिती या उपक्रमाचे संयोजक माजी नगरसेवक विजय उर्फ अप्पा रेणुसे यांनी कळविले आहे.
यंदाच्यावर्षी नारायणपूर येथील नारायण महाराज, योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद, भाउसाहेब जाधव आणि पारसमल जैन या गुरूजनांना अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. (Ajit Pawar)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मागील 16 वर्षांमध्ये शहरातील कला, विज्ञान, क्रिडा, साहित्य,
वैद्यकीय आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातील 100 हून अधिक गुरूजनांना गौरविण्यात आले आहे, अशी माहिती रेणुसे यांनी दिली.
Web Title :- Ajit Pawar | Gurujan Gaurav samarambh on 10th July in the presence of Ajit Pawar
हे देखील वाचा :
Comments are closed.