पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Ajit Pawar | पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक निकाल आज (PDCC Election Results) जाहीर झाला आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा गड पुन्हा एकदा राष्ट्रवादीनं (NCP) राखला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या सुरेश घुले (Suresh Ghule) यांचा पराभव झाला आहे. यामुळे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना धक्का बसला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विकास दांगट (Vikas Dangat) यांनी विद्यमान संचालक आणि राष्ट्रवादीचेच ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के (Prakash Mhaske) यांचा पराभव केला.
पुणे जिल्हा बँकेची निवडणूक एकूण 21 जागांवर झाली. त्यापैकी 14 जागा आधीच निवडून आल्या आहेत. बाकी 7 जागांवर झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. त्यापैकी 3 जागांवर सुनील चांदेरे (Sunil Chandere), अशोक पवार (Ashok Pawar) व विकास दांगट (Vikas Dangat) हे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळात राष्ट्रवादीची संख्या 17 झाली आहे. तर, उर्वरित 4 जणांमध्ये इतर पक्षांचे सदस्य आहेत. (PDCC Election Results).
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, विद्यमान संचालक सुरेश घुले (Suresh Ghule) यांचा पराभव हा अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद (Pradeep Kand) यांनी घुले यांचा पराभव केला आहे.
तर ,कंद यांना 405 आणि घुले यांना 391 मते मिळाली. कंद यांना बारामतीमधूनच निर्णायक 52 मते मिळाली आहेत.
बिनविरोध निवडून आलेले सदस्य –
अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, संग्राम थोपटे, संजय जगताप, दिलीप मोहिते, रमेश थोरात, संजय काळे, आप्पासाहेब जगदाळे, माऊली दाभाडे, रेवनाथ दारवटकर, प्रविण शिंदे, संभाजी होळकर, दत्तात्रेय येळे.
Web Title :- Ajit Pawar | big jolt to ajit pawar in pune district bank election ncp rebel wins by huge margin pradeep kand.