मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Ajit Pawar | ”अजित पवार यांनी आयुष्यभर पैसे काढून घेण्याचं आणि जमिनी लाटण्याचं काम केलं.” असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं होतं. दरम्यान या वक्तव्यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पलटवार केला आहे. ”मी मंत्रालयात सर्वात लवकर येऊन सर्वात उशिरापर्यंत बसून काम करणारा मंत्री आहे. हे सर्व जनता जाणते, त्यामुळे चंद्रकांतदादांनी बेजबाबदार व बिनबुडाची वक्तव्ये करु नयेत,” अशा सडेतोड शब्दात प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिलं आहे.
अजित पवार बोलताना म्हणाले, की ”मी मंत्रालयात सर्वात लवकर येऊन सर्वात उशिरापर्यंत बसून काम करणारा मंत्री आहे. हे सर्व जनता जाणते, त्यामुळे चंद्रकांतदादांनी बेजबाबदार व बिनबुडाची वक्तव्ये करू नयेत. महाराष्ट्रात हेलिकॉप्टर घेऊन फिरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. कुठून कुठे जाणार याचीही माहिती द्यावी लागते. चंद्रकांत पाटील यांना ही वस्तूस्थिती माहीतीय. तरीही ते अशी वक्तव्य करत आहेत. याला मराठीत ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असं म्हणतात.” असं ते म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुढे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ”चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याला किती गांभीर्याने घ्यावे, हे जनतेने ठरवावे असा टोला देखील अजित पवार यांनी यावेळी लगावला आहे.. मी काम करणारा माणूस आहे. माझ्या परीने मला जेवढी शक्य होतील तेवढी जनतेची कामे मी निस्वार्थीपणे करत असतो. चंद्रकांतदादांनी बोलताना जरा भान ठेऊन बोलावं,” असं ते म्हणाले.
दरम्यान, ”अजित पवार यांनी आयुष्यभर पैसे काढून घेण्याचं आणि जमिनी लाटण्याचं काम केलं. अजित पवार हे हेलिकॉप्टरने जमिनी शोधतात, कुणाची जमिन शिल्लक आहे का ते पाहतात. धरणाची जमिनही सोडत नाही,” असे गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केले होते.
Web Title :- Ajit Pawar | ajit pawar reply chandrakant patil on his criticism
Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल; म्हणाले – ‘राज्यात टोळीचे सरकार चाललंय काय ?’
Ravi Rana | आमदार रवी राणांवर IPC 307 कलमान्वये FIR, राजकीय वाद चिघळला