अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या भव्य इमारतीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘आपले काही अधिकारी जबाबदारी दिल्यानंतर अतिशय चुकीचे वागतात. त्यामुळे लोकांनाही कळत नाही की यांनी काय हे काय चालवले आहे. अधिकाऱ्यांकडे नोटाच मिळायला लागतात. आपल्याकडे ताजे उदाहरण आहे. कोण कुठले सुपे काही कळायला मार्ग नाही. सभागृहामध्ये आम्ही कालच सांगितले आहे, या प्रकरणात कोणीही असले अथवा त्याचे धागेदोर कितीही वरपर्यंत असले तरी जे कोणी दोषी असतील त्यांना मुलांच्या भवितव्यासोबत खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. (TET Exam Scam Case)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुढे अजित पवार म्हणाले, ‘पुणे पोलीस आयुक्तांचा (Pune Police Commissioner) तपास योग्य दिशेने सुरु आहे. ते याच्या मुळापर्यंत जातील याची आम्हाला खात्री आहे. हे प्रकरण समाजाला अडचणीत आणणारे आणि घातक आहे. असे पुन्हा घडू नये आणि यात राजकारण आणू नये. CBI ला भरपूर कामं आहेत. आपले पोलीस सक्षमपणे काम करताहेत. याआधी ही आपण सीबीआयला खूप प्रकरणे सोपवली. सुशांत सिंह प्रकरणात काय झालं, शेवटी आत्महत्या आहे हेच पुढं आले आहे. उगाच आभास निर्माण करू नये. आपली पोलीस यंत्रणा कमी पडली तर दुसऱ्या कोणाची मदत घ्यायची की नाही हे पाहू,’ असं ते म्हणाले.
Web Title :- Ajit Pawar | ajit pawar reaction to tukaram supe action in tet scam MahaTET Exam Scam
Pune Crime | मुंबई-बंगळूरू महामार्गावर चांदणी चौकात भीषण अपघात; 2 ठार, 3 गंभीर जखमी
Pune Crime | हातात कोयता घेऊन परिसरात दहशत पसरवणारा ‘भाई’ गजाआड, वाकड पोलिसांची कारवाई