पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (NCP) नेत्यांचे सत्ताधारी भाजपच्या (BJP) नेत्यांसोबत असलेल्या मैत्रीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचले. मला इथली सगळी अंड्डी पिल्ल माहिती असून सर्वांनी एकत्रितपणे काम करुन प्रखरपणे विरोध केला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. तसेच मॅच फिक्सिंग (Match fixing) करण्याची भूमिका घेऊ नका असा सल्लाही देयला अजित पवार (Ajit Pawar) विसरले नाहीत.
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, चुकीच्या कामाला विरोध करुन आंदोलन (agitation) करा. सर्वांनी एकदिलाने आवाज उठवला पाहिजे. भ्रष्टाचारासंदर्भात निवेदन, पत्रकार परिषद सर्वांनी एकत्रपणे घ्यावी. एकाने निवेदन दिले म्हणजे त्याचेच काम आहे असे म्हणू नका, मला पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) नवीन नाही. इथली सगळी अंड्डी पिल्ल मला माहिती आहेत. मी तुम्हाला प्रोत्साहन, ऊर्जा देऊ शकतो, मी एकटा काहीही करु शकत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी चुकीच्या कामाला विरोध हा केलाच पाहिजे. मागच्या निवडणुकीत विरोधकांनी प्रशासनाकडील चुकीच्या कामाचे खापर राष्ट्रवादीवर फोडले. काही बाबतीत ते लोकांना खरे वाटले आणि आपली सत्ता गेली, असे अजित पवार म्हणाले.
प्रत्येकाचे मित्रत्वाचे संबंध असतात, परंतु ते संबंध कुठपर्यंत असावेत याचे देखील आत्मपरिक्षण, आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळी आपली भूमिका आक्रमकपणे लोकांसमोर मांडू त्यावेळी ती जनतेला समजण्यास वेळ लागत नाही. बोटचेपे धोरण घेतले तर लोकांच्या लक्षात येते. यांचे काय चाललय, यांचे मॅच फिक्सिंग चाललीय की आणखी काय हे सर्व तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
माझे देखील विरोधकांसोबत चांगले संबंध होते.मात्र मी 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कधीही कोणाशी फिक्सिंग केली नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पक्षाने जो अधिकृत उमेदवार (Authorized Candidate) दिला आहे त्याचे मनापासून काम करायचे आणि त्याला निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकद लावायची असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तू त्या वॉर्डात आम्हाला मदत कर मी तुला या वॉर्डात मदत करतो असले प्रकार याठिकाणी घडतात. सर्वच करतात असे नाही. पण काही जण करतात. त्याचा फटका काम करणाऱ्या कर्यकर्त्याला बसतो. घरातच घरभेदी असेल तर काहीही होत नाही.
त्यामुळे जर अशा सवयी असतील तर त्या काढून टाका, असा सल्ला अजित पवार यांनी दिला.
Web Title : Ajit Pawar | ajit pawar pierced the ears of party office bearers pune pimpri chinchwad ncp workers
Mumbai Crime | ACP दिपक फटांगरे आणि IPS देवेन भारती यांच्यावर FIR; जाणून घ्या प्रकरण