मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Ajit Pawar | राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल (बुधवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आलं. यावर अनेक नेत्यांनी तर्क वितर्क लावल्यानंतर स्वत: शरद पवार यांनी पंतप्रधान यांच्या भेटीबाबत पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे. तरीही कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबतही चर्चा उफाळत असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत खुलासा केला आहे.
मुंबईत (Mumbai News) माध्यमांशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ”भेटीविषयी इत्थंभूत माहिती कुणीही सांगत नाही. माझं पवार साहेबांशी बोलणं झालं. ते म्हणाले, महत्त्वाच्या विषयांवर पंतप्रधानांशी चर्चा केली आहे. मला आणि दिलीप वळसे पाटलांना (Dilip Walse Patil) एकत्रपणे त्यांनी हे सांगितलं असल्याचं,” ते म्हणाले.
पुढे अजित पवार म्हणाले, ”शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेविषयी जाणून – बुजून गैरसमज पसरवला जात असल्याचं ते म्हणाले. तर, “जाणीवपूर्वक काही जण अशा प्रकारच्या बातम्या पेरून समाजात गैरसमज निर्माण करण्याचं काम करत आहेत. त्याला काही अर्थ नाही असं माझं स्पष्ट मत आहे. त्याचबरोबर, एकदा पवार साहेब बोलल्यानंतर आम्ही छोट्या कार्यकर्त्यांनी यावर बोलणं योग्य होणार नाही.”
दरम्यान, राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची यादी अद्यापही राजभवनात प्रलंबित असून त्याला मंजुरी कधी मिळणार ? याबाबत विचारणा होताच अजित पवारांनी शरद पवार – नरेंद्र मोदी भेटीचं स्पष्टीकरण दिलं आहे. ”सर्वोच्च नेत्यांना यासंदर्भात भेटायला हवं होतं.
तिथे शरद पवार भेटले आहेत. बघुयात काय होतंय ते,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Web Title :- Ajit Pawar | ajit pawar on sharad pawar pm narendra modi meeting
हे देखील वाचा :
ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांनो 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर व्हा – उच्च न्यायालयाचे निर्देश