Ajit Pawar | ठाण्याच्या माजी नगरसेवकाचा साताऱ्यात गोळीबार, दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का?, अजित पवारांचा संतप्त सवाल (व्हिडिओ)
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुलाच्या गाडीचा अपघात झाल्यावर स्थानिकांशी झालेल्या वादानंतर ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम (Thane Former Corporator Madan Kadam) याने सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मोरणा येथे गोळीबार (Firing) केला. या घटनेत दोन स्थानिकांचा मृत्यू (Death) झाला, तर एक जण अत्यवस्थ आहे. किरकोळ कारणावरुन गोळीबार करुन दोघांचा जीव घेयला ही काय मोगलाई आहे का? असा संतप्त सवाल अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. ते विधानसभेत बोलत होते. त्यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातल्या कायदा-सुव्यवस्थेवरुन (Law and Order) सरकारला चांगलेच धारेवर धरले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मुलाच्या गाडीचा अपघात झाल्यावर स्थानिकांशी झालेल्या वादानंतर ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम यानं सातारा जिल्ह्यातल्या मोरणा (ता. पाटण) येथे गोळीबार केला. या घटनेत दोन स्थानिकांचा मृत्यू झाला तर एकजण अत्यवस्थ आहे.#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३ pic.twitter.com/xbbvQvRYIg
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 20, 2023
काय म्हणाले अजित पवार?
ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम यांच्या मुलाच्या वाहनचा 15 मार्च रोजी मोरणा परिसरात अपघात झाला होता. अपघातावेळी त्यांची स्थानिकांशी बाचाबाची झाली. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी स्थानिक ग्रामस्थ व कदम यांच्यात वादावादी झाली होती. याचा राग मनात धरुन रविवारी रात्री ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम याने मोरणा भागात बेछुट गोळीबार केला. या घटनेत दोन स्थानिक व्यकींचा मृत्यू झाला.
तसेच येथील एका सोसायटीची निवडणूक (Society Election) व पवनचक्की चे (Windmill) प्रलंबित पेमेंट
हा विषयसुद्धा या गोळीबाराच्या मागे आहे. या घटनेत मृत व्यक्तींमध्ये मंत्री शंभूराज देसाई
(Shambhuraj Desai) यांचा कार्यकर्ता आहे.
या गोळीबाराच्या घटनेमुळे मोरणा खोऱ्यातील गुरेघर धरण परिसरात स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
या प्रकरणात मदन कदम व त्यांच्या दोन मुलांना अटक केली असली तरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था
राखण्याच्यादृष्टीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Ajit Pawar | ajit pawar asked the government to take the lives of both of them by firing
हे देखील वाचा :
Comments are closed.