बहुजननामा ऑनलाईन – जम्मू – काश्मीर मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारअजित डोवाल शोपिया यांनी जम्मू- काश्मीरचा दौरा केला. यावेळी त्यांनी नागरिकांची भेट घेतली. आणि नागरिकांसोबत जेवणही केले. तसेच त्यांनी तेथील सुरक्षा विषयी पाहणी केली आणि तेथील पोलीस अधिकाऱ्यांची भेटही घेतली. यावेळी त्यांच्या सोबत डीजीपी दिलबाग सिंह उपस्थित होते.
पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी नंतर अजित डोवाल यांनी लष्करी जवानांची भेट घेतली आणि सुरक्षेबद्दल चौकशी केली. जम्मू – काश्मीर मधील कलम ३७० हटवल्यानंतर अजित डोवाल यांची ही अशी पहिलीच भेट होती. अजित डोवाल यांच्या आधी मंगळवारी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली आणि संबंधित जिल्ह्यातील पोलिसांना आवाहन केले की आपल्या भागातील प्रत्येक नागरिकांची मदत करा.
याआधीच सोमवारी दिल्ली येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवास स्थानी एका तासापेक्षा अधिक वेळ सुरक्षा तंत्रणेच्या मंत्रिमंडळाची बैठक चालू होती. यामध्ये जम्मू – काश्मीरच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली होती. उच्चस्थरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते.
#WATCH Jammu and Kashmir: National Security Advisor Ajit Doval interacts with locals in Shopian, has lunch with them. pic.twitter.com/zPBNW1ZX9k
— ANI (@ANI) August 7, 2019