बहुजननामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन(Aishwarya Rai Bachchan), तिचा नवरा आणि अभिनेता अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या रविवारी हैदराबादमध्ये स्पॉट झाले. लॉकडाउननंतर ऐश्वर्या(Aishwarya Rai Bachchan) पहिल्यांदाच आपल्या कुटुंबासमवेत मुंबईतून बाहेर निघाली आहे. छायाचित्रांमध्ये ऐश्वर्या लेगिंग्ज, ब्लॅक कोट आणि मोठ्या आकाराचा सन ग्लासेस परिधान करताना दिसली आहे, तर तिची मुलगी आराध्या पिंक ट्रॅक पॅन्ट आणि टीशर्टमध्ये दिसली होती. अभिषेकने जॅकेट परिधान केलेले पाहायला मिळाले.
दरम्यान, ऐश्वर्या हैदराबादला का आली हे अद्याप समजू शकलेले नाही, पण काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की ऐश्वर्या तिच्या आगामी मणिरत्नमचा तामिल चित्रपट पोन्निन सेल्वानच्या शूटिंगसाठी आली होती. या चित्रपटात ऐश्वर्या डबल रोलमध्ये दिसणार आहे. पोन्निन सेल्वान हे कल्कि कृष्णमूर्ती नावाच्या काल्पनिक कादंबरीवर आधारित आहेत. चित्रपटाचे शूटिंग एकाच वेळी पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, मणिरत्नमची निर्मिती कंपनी मद्रास टॉकीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिव आनंद यांनी मे 2020 मध्ये सांगितले होते की, ‘इंडस्ट्रीमधील प्रत्येकाप्रमाणेच आम्ही पुन्हा शूटिंग सुरू करण्याविषयी आणि त्यांच्या तारखांविषयी अभिनेतांबरोबर बोलत आहोत. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकात हे अवघड आहे, परंतु हे आमचे काम आहे कि, आम्ही कोणत्या प्रकारे करू. ‘ ते पुढे म्हणाले, ‘चित्रपटाशी तडजोड करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. आम्ही 2021 या वर्षात या चित्रपटाचा एक भाग प्रदर्शित करू पण रिलीजच्या तारखेविषयी काही सांगू शकत नाही.
त्याचवेळी कोरोना साथीच्या आजारामुळे ऐश्वर्याने बहुतांश वेळ घरातच घालवला आणि कौटुंबिक फोटो, व्हिडिओंमध्ये ती फक्त सोशल मीडियावर दिसली. नुकतेच, नवीन वर्ष आणि ख्रिसमस पार्टीच्या फोटोमुळे संपूर्ण बच्चन कुटुंब चर्चेत आले होते. हे फोटो चाहत्यांनी सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले.