नवी दिल्ली : वृत्तसंस्था – AICTE News | केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (minister dharmendra pradhan) यांनी शनिवारी म्हटले की, अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद AICTE (एआयसीटीई) ने 11 प्रादेशिक भाषेत बीटेक अभ्यासक्रमाला (b-tech course in 11 regional languages) मंजूरी दिली आहे. या भाषांमध्ये हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगु, कन्नड़, गुजराती, मल्याळम, बांगला, असामी, पंजाबी आणि उडियाचा समावेश आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Prioritising learning in Indian languages and advancing PM @narendramodi’s vision of developing an ecosystem of technological education in local languages, 14 engineering colleges across 8 states will admit students in courses in regional languages from the new academic year. pic.twitter.com/WSZWAHN0Bv
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) July 17, 2021
प्रधान यांनी ट्विट केले की, एआयसीटीईने 11 प्रादेशिक भाषांमध्ये बीटेक अभ्यासक्रमाला (b-tech course in 11 regional languages) मंजूरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य प्रवाहातील शिक्षणात प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यास प्रतिबद्ध आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण विविध प्रदेशातून येणार्या विद्यार्थ्यांना सशक्त करण्यासाठी महत्वाचे काम करत आहे.
तत्पूर्वी, शनिवारी उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आठ राज्यांच्या 14 इंजिनियरिंग कॉलेजांसाठी नवीन शैक्षणिक वर्षपासून निवडक शाखांमध्ये प्रादेशिक भाषांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध करण्याच्या निणर्याचे स्वागत केले.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले, इंजिनियरिंग कॉलेजांमध्ये प्रादेशिक भाषांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध करण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी माननीय उपराष्ट्रपतीचे आभार.
Web Titel :- aicte education minister pradhan said aicte approves b tech course in 11 regional languages
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 364 नवीन रुग्ण