• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

अहमद पटेल यांचा राजकीय प्रवास, 26 व्या वर्षी खासदार ते सोनिया गांधीचे राजकीय सल्लागार

by sheetal
November 25, 2020
in राजकीय
0
Ahmed Patel

Ahmed Patel

बहुजननामा ऑनलाइन टीम – काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल(Ahmed Patel) यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. एक महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना कोरोनाची बाधा होती. त्यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. अहमद पटेल सध्याच्या काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जात. पटेल यांच्या जाण्याने काँग्रेसवर शोककळा पसरली आहे.

अहमद पटेल यांचा जन्म २१ ऑगस्ट १९४९ रोजी गुजरातमधील भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वर येथे झाला. त्यांचे वडील इशकजी पटेल हे काँग्रेस नेते आणि भरुच तालुका पंचायतीचे सदस्य होते. त्यांचे बोट धरूनच अहमद पटेल यांनी राजकारणात पदार्पण केलं. परंतु, पटेल यांनी स्वतःच्या मुलांना शेवटपर्यंत राजकारणापासून लांबच ठेवलं. पटेल यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पंचायत तालुका अध्यक्ष म्हणून केली. तदनंतर, तीन वेळा लोकसभा आणि पाच वेळा राज्यसभेवर सदस्य म्हणून काम केले.

१९७७ साली अहमद पटेल यांनी लोकसभेची पहिल्यांदा निवडणूक लढवली. त्यावेळी देशात इंदिरा गांधीविरुद्ध वातावरण असताना पटेल यांनी भरुच लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवत २६ व्या वर्षी लोकसभेत पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी गांधी कुटुंबीयांच्या तीन पिढ्यासोबत काम केले. इंदिरा गांधी यांनी १९८० मध्ये पटेल यांना मंत्रिमंडळात घेण्याची इच्छा व्यक्त केली. पण पटेल यांनी मंत्रिपद नाकारून संघटनेत काम करण्यास प्राधान्य दिले. इंदिरा गांधी यांच्यानंतर राजीव गांधी यांनीही मंत्रिपदाची ऑफर दिली होती. मात्र, त्यावेळीही त्यांनी त्यास नकार दिला.

अहमद पटेल यांनी राजीव गांधी यांचे संसदीय सचिव म्हणून काम करत असतानाच युवा काँग्रेसचे नेटवर्क तयार केले. १९८६ मध्ये ते गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यानंतर १९९१ मध्ये नरसिंहा राव यांच्या कार्यकाळात त्यांना काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे सदस्य बनवण्यात आले. तिथे ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले. १९९६ साली पटेल काँग्रेसचे कोशाध्यक्ष बनले. २००० मध्ये सोनिया गांधी यांच्या खासगी सचिवांसोबत झालेल्या वादानंतर त्यांनी हे पद सोडले. मात्र, काही दिवसांनी ते सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार बनले.

त्यानंतर दिल्ली कारभारातील राजकारणात पटेल यांनी स्वतःला प्रस्थापित केले. गांधी कुटुंबीयांसोबत काँग्रेसचे संकटमोचक म्हणून त्यांच्याकडे पहिले जात. असे म्हटले जाते की, पटेल यांच्या सल्ल्यांमुळेच सोनिया गांधी राजकारणात स्वतःला प्रस्थापित करू शकल्या. अहमद पटेल यांना १० जनपथचे चाणक्य असे संबोधले जात. २००४ ते २०१४ या काळात काँग्रेस पक्ष सत्तेत असताना अहमद पटेल यांची राजकीय ताकद सर्वांनी अनुभवली होती. त्याचसोबत राज्यांपासून केंद्रांपर्यंत स्थापन होणाऱ्या सरकारांमध्ये काँग्रेस नेत्यांचे भवितव्य पटेलच निश्चित करत. अर्थात काँग्रेसचा रिमोट कंट्रोलच अहमद पटेल यांच्याकडे होता.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामा
Previous Post

‘आश्रम’ सीरिजमधील ‘पम्मी’ आदिती पोहनकरच्या Hot बिकिनी अवताराची सोशलवर जोरदार ‘चर्चा’ !

Next Post

पोलिसांच्या मुलांनी देखील संधींचा फायदा घ्यावा अन् यशस्वी उद्योजक व्हावे : पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश

Next Post
Commissioner of Police Krishna Prakash

पोलिसांच्या मुलांनी देखील संधींचा फायदा घ्यावा अन् यशस्वी उद्योजक व्हावे : पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश

Loni Kalbhor Gram Panchayat
इतर

लोणी काळभोर ग्रामपंचायतीमध्ये ‘परिवर्तन’

January 18, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - पूर्व हवेलीतील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या लोणी काळभोर ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माधव काळभोर माजी जिल्हा...

Read more
Statement of former Chief Minister

‘कोरोना’मुळं बायकोचं चुंबनही घेतलं नाही, मग.. ; माजी मुख्यमंत्र्यांचं भर कार्यक्रमात वक्तव्य

January 18, 2021
Tandav

Tandav मुळं ‘तांडव’ ! ‘सैफ-करीना’च्या घराबाहेर तैनात केली सुरक्षा, मेकर्सला ‘समन्स’

January 18, 2021
Ranveer-Deepika

Video : ‘रणवीर-दीपिका’ कधी कधी घालतात एकमेकांचेच शुज ! खुद्द अभिनेत्रीनं केला खुलासा

January 18, 2021
Deputy Chief Minister Ajit Pawar

शेतकर्‍यांबाबत केंद्र सरकारचे वर्तन दुर्देवी – उपमुख्यमंत्री अजित पवार

January 18, 2021
Shiv Sena rule

25 वर्षांची शिवसेनेची सत्ता उलथवली; राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतीत मनसेनं बाजी मारली

January 18, 2021
Jayant Patil

Sangli News : जयंत पाटलांच्या सासरवाडीतील मतदारांचा राष्ट्रवादीला दणका, मेव्हणे अन् पाहुणे सगळेच हरले

January 18, 2021
Aniket Kothale murder case

Sangli News : अनिकेत कोथळे हत्या प्रकरण ; मृतदेह माझ्या समोर जाळला, साक्षीदाराची न्यायालयात साक्ष

January 18, 2021
Union Minister of State Danve

केंद्रीय राज्यमंत्री दानवेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला धक्का

January 18, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Ahmed Patel
राजकीय

अहमद पटेल यांचा राजकीय प्रवास, 26 व्या वर्षी खासदार ते सोनिया गांधीचे राजकीय सल्लागार

November 25, 2020
0

...

Read more

‘मोदी सरकारनं 100 वेळा बोलावलं तरी जाऊ, पण कायदे रद्द झालेच पाहिजेत’

3 days ago

Photos : रिंकू राजगुरूनं शेअर केला ‘तो’ फोटो ! लुकपेक्षा कॅप्शनचीच जोरदार चर्चा

4 days ago

Twitter वर युजर्सच्या चॅलेंजला रिप्लाय देत PM नरेंद्र मोदींनी दिला सर्वांनाच धक्का !

2 days ago

Kolhapur News : पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असणार्‍या कारखान्यांवर तात्काळ कारवाई करा – विभागीय आयुक्त सौरभ राव

3 days ago

डेटिंगबाबत काय विचार करते जान्हवी कपूर, करीनाच्या शो मध्ये केला खुलासा

3 days ago

Pimpri News : प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी दोघांनी चोरले तब्बल 26 महागडे स्मार्ट फोन

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat