वॉशिंग्टनः वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्याच्यापूर्वी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे. ‘आपण भारतासह पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भेटू,’ असे ट्रम्प यांनी सांगितले आहे. ट्रम्प २२ सप्टेंबर रोजी ह्युस्टनमध्ये पीएम मोदीसमवेत Howdy Modi कार्यक्रमास संबोधित करणार आहेत. मात्र, ते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कधी भेटतील हे त्यांनी सांगितले नाही. या दरम्यान त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या तणावाचा संदर्भही दिला आणि म्हणाले की या दिशेने बरीच प्रगती झाली आहे.
पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौर्यावर येणार आहेत, अश्या वेळी भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भेट आणि दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याविषयी ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे . ते रविवारी, २२ सप्टेंबर रोजी हॉस्टनच्या एनआरजी स्टेडियमवर होणार्या मोदींच्या कार्यक्रमास संबोधित करतील, अध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंधातील नवीन जवळीकीवर जोर देण्याचे बोलले जात आहे.
पंतप्रधान मोदींच्या अमेरिका भेटीच्या अगोदर ट्रम्प यांनी सांगितले की, ते भारतीय पंतप्रधानांना भेटण्याबरोबरच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनाही भेटतील. ट्रम्प यांनी सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, “मी पंतप्रधान मोदींना भेटून भारत आणि पाकिस्तान यांच्याशी बैठक घेईन’. अध्यक्ष ट्रम्प यांनी मात्र ते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट कधी घेतील याचा खुलासा केला नाही, परंतु या महिन्यात न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या अधिवेशनाच्या वेळी ते पाकच्या पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ट्रम्प यांच्या कार्यक्रमानुसार, २२ सप्टेंबर रोजी हॉस्टनमध्ये पंतप्रधान मोदींसोबत Howdy Modi कार्यक्रमास संबोधित केल्यानंतर ते ओहायोला भेट देतील. त्यानंतर ते संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या वार्षिक सत्रासाठी न्यूयॉर्कला जातील. यावेळी ते इम्रान खान यांची भेट घेतील अशी अपेक्षा आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प म्हणाले की, ते कमी करण्याच्या दृष्टीने बरीच प्रगती झाली आहे. यावेळी त्यांनी काश्मीरचे नाव घेतले नाही, ज्यामुळे संबंधित भारतीय राज्यघटनेच्या कलम ३७० ला अकार्यक्षम ठरविण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाच्या नंतर दोन्ही देशांमधील तणाव उंचावर पोहोचला आहे.
US President Donald Trump: I will see Prime Minister Narendra Modi and I will be meeting with India and Pakistan. I think a lot of progress is being made there. (File pic) pic.twitter.com/ThMkqjzBzC
— ANI (@ANI) September 17, 2019