पटना : वृत्तसंस्था – बिहारची राजधानी पटनामधी पाटलीपुत्रमधून हैराण करणारी घटना समोर आली आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ पाहिल्याने एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांना नेहरू नगरमध्ये एका 34 वर्षी माणसाचा मृतदेह सापडला आहे. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर तरुण आक्षेपार्ह व्हिडीओ पहात होता आणि त्याची नकल करत होता. याच वेळी त्याचा गळा दाबला गेला आणि त्याचा जीव गेला. घटनास्थळी पोलिसांना एक मोबाईल सापडला असून यावरून पोलीस तपास करत आहेत. मोबाईलमध्ये व्हिडीओ सुरुच होतं. सदर युवक हा एका मेडिकल कंपनीत काम करत होता.
डीएसपी राकेश कुमार म्हणाले की, या युवकाच्या फोनमध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ मिळाले आहेत. ज्याप्रकारे व्हिडीओत पोज देण्यात आल्या होत्या त्या युवकाचा मृतदेहदेखील त्याच अवस्थेत होता.” या घटनेची माहिती पोलिसांना मृतकाच्या रूम पार्टनरने दिली होती. रुप पार्टनर राहुल दास जेव्हा रुममध्ये परत आला तेव्हा त्याने पाहिलं की, रुम आतूनच बंद आहे. त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि एफएसएल ला तपासासाठी बोलावलं.
मानसशास्त्रज्ञांच्या मते, मृतकाचे शव आणि मोबाईल पाहिल्यानंतर लक्षात येतं की, त्याची मानसिक स्थिती ठिक नव्हती. असे लोक बीडीएमएसचा अभ्यास करतात. बीडीएमएसचा अर्थ आहे की, आक्षेपार्ह व्हिडीओ पाहून सेक्सची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे.