भोपाळ : वृत्तसंस्था – प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केला या कारणाने प्रियकराने तिची निर्घृण हत्या केली. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. आता आरोपी प्रियकरानं स्वतःही तुरुंगात गळफास घेत आत्महत्या केली आहे. आरोपीनं चालत्या ट्रेनमध्ये आपल्या प्रेयसीची हत्या केली होती. यानंतर भोपाळमध्ये जीआरपीनं या आरोपीला अटक केली होती. तेव्हापासून तो सीहोर जेलमध्ये होता. मात्र, आता आपल्या प्रेयसीची हत्या केल्यानंतर पाचव्या दिवशी या युवकानं स्वतःही आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर ट्रेनमध्ये वृत्तपत्र आणि चहा विकण्याचं काम करायचा. सागर आणि मुस्कान यांची मैत्रीही होती. आरोपी सागरनं पोलिसांनी चौकशीत असं सांगितलं, की त्याचं मुस्कानवर प्रेम होतं. मात्र, मुस्काननं त्याच्या मोबाईल नंबर ब्लॉक केला होता. यामुळे त्याला मुस्कानसोबत बोलता येत नव्हतं. याच कारणामुळे त्यानं १ जून रोजी चालत्या ट्रेनमध्ये मुस्कानची हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा भोपाळचा रहिवासी आहे. त्याचे नाव सागर सोनी असं आहे. १ जूनच्या रात्री इंदौर-बिलासपुर नर्मदा एक्सप्रेस ट्रेनमध्ये त्याने आपल्या २१ वर्षीय प्रेयसी मुस्कान हाडा हिची गळा चिरुन हत्या केली. यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला. यानंतर संपूर्ण ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली. यानंर ट्रेन सीहोर स्टेशनवर थांबवण्यात आली. इथून ही ट्रेन दोन तासांनी सोडण्यात आली. पोलिसांनी तरुणीचा मृतदेहही शवविच्छेदनासाठी सीहोरमध्ये उतरवला. पोलीस आणि जीआरपी या प्रकरणाचा तपास करत होते. याच दरम्यान पोलिसांनी आरोपी सागर सोनी याला भोपाळमधून अटक केली.
दरम्यान, पोलिसांनी सांगितलं की सोमवारी याबाबतची माहिती मिळाली, की सीहोर तुरुंगात बंद असलेल्या भोपाळचा निवासी सागर सोनी यानं टी शर्टच्या सहाय्यानं गळफास घेत आत्महत्या केली. जेल कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. जेल अधीक्षक संजय सेहलाम यांनी सांगितलं, की त्याला दोन दिवस आधी कैद करण्यात आलं होतं. कोविड प्रोटोकॉलमुळे त्याला विभक्त ठेवण्यात आलं होतं. याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं कारणही स्पष्ट होईल.
कृपया हे देखील वाचा:
इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! 280 जागांसाठी भरती, लवकर करा अर्ज
पुण्याच्या बिबवेवाडी परिसरातील हळंदे टोळीवर मोक्का
स्पर्मपेक्षा कितीतरी पट जास्त किमती, जाणून घ्या – महिलांच्या एग्ज बाबत ‘या’ 8 रंजक गोष्टी