• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

After Lockdown : वाहतूककोंडीत मुंबई जगात दुसरी, बंगळुरु 6 व्या, तर दिल्ली 8 व्या क्रमांकावर

by sheetal
January 14, 2021
in इतर
0
world in traffic congestion

world in traffic congestion

बहुजननामा ऑनलाइन टीम – सन 2020 मधील सर्वाधिक वाहतूक कोंडींच्या शहरांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीत रशियाची राजधानी मॉस्को हे एकमेव शहर सर्वाधिक वाहतूक कोंडीच्या प्रथम क्रमांकावर (world in traffic congestion)आहे. तर मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे लॉकडाउनच्या कालावधीमध्ये फारशी वाहतूक नसतानाही मुंबई या नकोश्या यादीत जगात दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत भारतातील आणखी 2  शहरांचाही समावेश असून बंगळुरु 6 व्या तर दिल्ली 8 व्या स्थानी आहे.  टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सने केलेल्या या सर्वेक्षणामध्ये जगभरातील 57 देशांमधील 416 शहरांचा अभ्यास केल्यानंतर ही यादी जाहीर केली आहे.

मुंबईमधील वाहतूक कोंडीची परिस्थिती दर वर्षाला बिकट होत असल्याचे चित्र या आकडेवारीमधून दिसून येत आहे. सन 2019 आणि 2018 च्या यादीमध्ये मुंबई चौथ्या स्थानी होती. मात्र यंदा मुंबईने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. मुंबईच्या उलट बंगळुरुमधील वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. मागच्या वर्षी पाचव्या स्थानी असणारे बंगळुरु शहर यंदा सहाव्या स्थानी आहे.  सध्या 51  टक्के वाहतूक कोंडी असणाऱ्या बंगळुरुमध्ये 2019 मध्ये 71 टक्के वाहतूक कोंडी होत असत.

जगभरातील 400 हून अधिक शहरांमधील वाहतूक कोंडीवर अभ्यास केल्यानंतर मुंबईला दुसरे सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारे शहर म्हणून घोषित केले असले तरी  एक समाधानकारक बाब सुद्धा या अहवालामध्ये नमूद केली आहे. यादीमध्ये मुंबईने दोन स्थानांनी झेप घेतली असली तरी मुंबईतील वाहतूक कोंडीचे प्रमाण हे मागील वर्षीपेक्षा 12 टक्क्यांनी कमी आहे.

टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या अहवालानुसार मुंबईमधील वाहन चालकांचा वाहतूक कोंडीमुळे सर्वसाधारण वेळेपेक्षा 53 टक्के अधिक वेळ प्रवासामध्ये जातो. मुंबईप्रमाणेच या यादीमध्ये फिलिपिन्समधील मनिला, कंबोडियामधील बोगोटा, रशियामधील मॉस्को आणि नोव्होसीबीर्स, युक्रेनमधील कॅव्ही, पेरुमधील लिमा, टर्कीमधील इस्तंबूल आणि इंडोनेशियामधील जकार्ता शहराचा समावेश आहे.

टॉमटॉमचे अधिकारी पराग बेडारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईसहीत जगभरातील अनेक मोठ्या शहरांमध्ये यंदा वाहतूक कोंडीचे प्रमाण घटण्यामागील प्रमुख कारण म्हणजे लॉकडाऊन आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीचा अभ्यास केल्यानंतर सकाळच्या वेळेतील वाहतूक कोंडी ही 2020 मध्ये 18 टक्क्यांनी तर संध्याकाळच्या वेळातील वाहतूक कोंडी ही 17 टक्क्यांनी कमी झाल्याचे ते म्हणाले. कोरोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये अनेक कंपन्यांनी घरुन काम करण्याची मूभा दिल्याने मुंबईसहीत सर्वच शहरांमधील वाहतूक कोंडीच समस्या थोड्याफार प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले असे बेडारकर यांनी नमूद केले आहे.

टॉमटॉम कंपनी मोठ्या शहरांमध्ये प्रवास करणाऱ्यांबरोबरच सरकारलाही या वाहतूक कोंडीसंदर्भातील माहितीच्या आधारे मदत करते. सरकारी यंत्रणांना अधिक चांगल्याप्रकारे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे, सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचे नियोजन करण्यासाठी ही माहिती पुरवली जाते.

Tags: After LockdownMumbai ranksworld in traffic congestionवाहतूककोंडी
Previous Post

इंधन दरात आणखी वाढ; पेट्रोलने केली नव्वदी पार

Next Post

PM मोदींच्या जवळचे IAS अधिकारी राहिलेले AK शर्मांची भाजपामध्ये एन्ट्री, लढवू शकतात MLC

Next Post
AK Sharma

PM मोदींच्या जवळचे IAS अधिकारी राहिलेले AK शर्मांची भाजपामध्ये एन्ट्री, लढवू शकतात MLC

Cameroon
इतर

Cameroon : तेलाचा टँकर आणि बसचा भीषण अपघात, 53 लोकांचा जागीच मृत्यू

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -बुधवारी एक बस आणि टँकरची जोरदार धडक झाली. हा भीषण रस्ता अपघात मध्य आफ्रिकी देश कॅमरूनमध्ये (Cameroon)...

Read more
prevent birth defects

बाळात जन्मदोष निर्माण न होण्यासाठी प्रेग्नेंसीतच घाला आळा, जाणून घ्या

January 28, 2021
Alia Bhatt

आलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो ! लोक म्हणाले…

January 28, 2021
theater

आता बदलणार थिएटरमधील ‘नजारा’ !

January 28, 2021
Sharad Pawar

शरद पवार यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘…तर शेतकर्‍यांवर अशी वेळ आली नसती’

January 28, 2021
Weight Loss

Weight Loss : कधीही नाही वाढणार ‘या’ 7 पद्धतींनी घटवलेले वजन, वेट लॉस ट्रेनिंगचा बेस्ट फॉर्मूला

January 28, 2021
property cards

Pune News : नागरिकांना आता घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड, शासकीय कामांसाठी धरले जाणार ग्राह्य, जाणून घ्या

January 28, 2021
Shakti Kapoor breaks silence

श्रद्धा कपूरच्या लग्नाच्या चर्चांवर पप्पा शक्ती कपूर यांनी सोडलं मौन ! म्हणाले…

January 28, 2021
Farmers' agitation

शेतकरी आंदोलन : हिंसाचारात मदत करणाऱ्या शेतकरी नेत्यांना दिल्ली पोलिसांकडून ‘लुकआउट नोटीस’ जारी

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

Aurangabad News : उच्च शिक्षणासाठी औरंगाबादमध्ये आलेल्या तरूणाचा बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

7 days ago

मोदी सरकार 19 कोटी EPF खातेधारकांसाठी करू शकतं मोठी घोषणा, जाणून घ्या कोणाला होईल फायदा

4 days ago

Bigg Boss 14 : राहुल वैद्यनं ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतला घातली अंघोळ ! अलीनंही केलं ‘हे’ काम (व्हिडीओ)

23 hours ago

Pune News : येत्या 2 दिवसात तापमानाचा पारा घसरणार, थंडीच्या दिवसातही होणार पावसाचा शिडकाव, हवामान खात्याचा अंदाज

3 days ago

नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधानपदी कोणाला सर्वाधिक पसंती ? शरद पवार की नितीन गडकरी का योगी आदित्यनाथ ? सर्व्हेमध्ये खुलासा

5 days ago

त्वचा सुंदर हवी असेल तर आहारात ‘या’ 2 गोष्टींचा करा समावेश!

2 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat