मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार इरफान खाननं काल (बुधवार दि 29 एप्रिल) जगाचा निरोप घेतला आहे. 53 वर्षीय अभिनेता दीर्घकाळापासून कॅन्सरसोबत लढा देत होता. कालच त्याला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आयसीयुत त्याच्यावर उपचार सुरू होते. इरफानच्या कुटुंबात त्याची पत्नी सुतापा सिकदर आणि दोन मुलं आहेत. बाबिल आणि आयान अशी त्यांची नावं आहेत. जाणून घेऊयात त्याच्या कुटुंबात कोण कोण आहे आणि निधनानंतर इरफाननं कुटुंबासाठी किती संपत्ती सोडली आहे.
इरफान खानचं कुटुंब
पत्नी- सुतापा सिकदर
मोठा मुलगा- बाबिल खान
लहान मुलगा- आयान खान
बहिण- रुकसाना बेगम
मोठा भाऊ- इम्रान खान
लहान भाऊ- सलमान खान
321 कोटींच्या संपत्तीचा मालिक होत इरफान
मीडिया रिपोर्टनुसार, इरफान खान एकूण 321 कोटींच्या संपत्तीचा मालक होता. थिएटरच्या दुनियेतून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणाऱ्या इरफानचा स्त्रोत सिनेमा आणि जाहिराती होत्या. अॅक्टींग फीव्यतिरीक्त इरफान सिनेमाच्या प्रॉफिटमध्ये शेअर घेत असे. त्याचं मुंबईत एक घर आणि जुहूमध्ये एक फ्लॅट आहे. सर्वात जास्त इनकम टॅक्स देणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्यांपैकी तो एक आहे.