नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील सोनभद्रच्या डोंगरावर ३ हजार टन सोन्याचा साठा सापडला आहे. याची पुष्टी झाली आहे आणि आता लिलाव प्रक्रिया सुरू केली जाईल. यासह सोनभद्रातह युरेनियम देखील सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.असे झाल्यास सोनभद्र सोन्याहून पिवळे होईल. खरेतर, सोनभद्रचे खनिज अधिकारी केके राय म्हणाले की, जिल्ह्यात युरेनियमचाही साठा सापडण्याची शक्यता आहे, त्यासाठी केंद्रीय व अन्य टीम शोधात गुंतले आहेत. ते म्हणाले की, भूगर्भशास्त्र आणि खाण विभाग व भूगर्भीय सर्वेक्षण विभाग यांची टीम या कामात गुंतली आहे.
सोनभद्रच्या सोनपहाडी आणि हरदी भागातील लोक खूप आनंदित आहेत. प्रशासनाच्या अहवालानंतर संपूर्ण जिल्हा श्रीमंत होऊ शकतो. इथल्या दोन टेकड्यांमध्ये सोने, युरेनियमसह बरेच धातू आणि खनिजांचा साठा आहे. सोन्याच्या साठ्यांबाबत ऐकून लोक चकित झाले. जिल्ह्यातील सोने पहाडीवर सोन्याच्या साठ्यासह डोंगराच्या पायथ्याशीही युरेनियमचा मोठा साठा असण्याची शक्यता आहे. सन २०१२ पासून या साठ्याविषयी ठोस माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू होती. आता सोन्याबरोबर युरेनिअमची देखील माहिती मिळू शकेल.
येथे डोंगरात 3000 हजार टन सोन्याचे साठे सापडले आहेत, यासाठी सरकार लिलावासाठी पुढील प्रक्रिया करणार आहे. ही बातमी आल्यानंतर सोनभद्र देशभरात चर्चेत आला आहे. सोनभद्रात हे सोने मिळेल की नाही याकडे लोक सोनभद्रवर लक्ष ठेवून आहेत. असा अंदाज आहे की आतापर्यंत भारताकडे जितके सोन्याचे प्रमाण आहे ते जगाच्या सोन्याच्या तुलनेत खूपच कमी आहे. परंतु सोनभद्रात सोन्याचे साठे उपलब्ध झाल्याने सोन्याच्या उत्पादनात तो जगात दुसऱ्या क्रमांकावर येईल.