• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘धनंजय मुंडे, महेबुब शेखनंतर आता संजय राठोड प्रकरणीही का होत नाही कारवाई ?’

by Namrata Sandhbhor
February 27, 2021
in मुंबई, राजकीय
0
dhananjay-munde-chandrakant-patil-sanjay-rathod

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – पूजा चव्हाण या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केले असून त्यांनी बेहिशोबी संपत्ती जमवल्याचा आरोप आहे. पती विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये पूजा चव्हाण प्रकरणात अद्याप कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार मंत्र्यांवरील व पक्षातील नेत्यांवर असलेल्या आरोपांची प्रकरणं दाबत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, धनंजय मुंडे यांच्यावर अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही, एका मंत्र्याच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात पकडण्यात आले, त्यांच्यावर देखील कोणतीच कारवाई झाली नाही. एका मंत्र्यांने कार्यकर्त्याला घरी जाऊन मारले, त्याच्यावर ही कारवाई नाही, एका पक्षाच्या युवक अध्यक्षावर बलात्काराचा आरोप असुन देखील कोणतीच कारवाई नाही.

परंतु, पूजा चव्हाण प्रकरणात आवाज उठवणाऱ्या चित्रा वाघ यांच्या पती विरोधात आत्ताच चौकशी का सुरु होतेय, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

भाजप चित्रा वाघ यांच्या पाठिशी
चंद्रकांत पाटील म्हणाले, पक्षाच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर अशाप्रकारची कारवाई केल्याने आम्ही घाबरणार नाही. चित्रा वाघ या वाघीण आहेत, भाजपा पक्ष पूर्णपणे त्यांच्या पाठिशी असल्याचे, पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काय आहे प्रकरण ?
चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ हे मुंबईतील परेल येथील गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल या पदावर कार्यरत होते. 5 जुलै 2016 रोजी एका प्रकरणात 4 लाख रुपयांची लाच घेताना अटक झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते.

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरच 1 डिसेंबर 2006 ते 5 जुलै 2016 या सेवा कालावधित किशोर वाघ यांच्या संपत्तीची खुली चौकशी लावण्यात आली होती. या तपासात किशोर वाघ यांच्याकडे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची अपसंपदा आढळून आली. या खुल्या चौकशीच्या अहवालानुसार प्रथमदर्शनी दोषी आढळल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ जगताप यांच्या तक्रारीवरुन किशोर वाघ विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये 12(2) आणि 13(1)E या कलमांतर्गत 12 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला.

Tags: allegationsarrestAssistant Commissioner of Police Navnath JagtapBJP leader Chitra Waghbjp state president chandrakant patilcomplaintcrimeDhananjay MundeDrugsGandhi Memorial HospitalKISHOR WAGHPooja Chavan's casePress conferencePrevention DepartmentSanjay Rathodअटकआरोपकिशोर वाघगांधी स्मारक रुग्णालयगुन्हाड्रग्जतक्रारधनंजय मुंडेपत्रकार परिषदपूजा चव्हाण या प्रकरणप्रतिबंधक विभागभाजप नेत्या चित्रा वाघभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलसंजय राठोडसहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ जगताप
Previous Post

मुंबईतील महिलेचे संजय राऊतांवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण; शिवसेना पुन्हा अडचणीत ?

Next Post

Pune News : मंडई विद्यापीठ कट्टाच्या वतीने विचारांची देवाणघेवाण संवाद कार्यक्रम; अशोक बालगुडे म्हणाले – ‘सामान्यांचा आवाज ऐकू आला पाहिजे’

Next Post
Ashok-Balgude

Pune News : मंडई विद्यापीठ कट्टाच्या वतीने विचारांची देवाणघेवाण संवाद कार्यक्रम; अशोक बालगुडे म्हणाले - 'सामान्यांचा आवाज ऐकू आला पाहिजे'

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

dhananjay-munde-chandrakant-patil-sanjay-rathod
मुंबई

‘धनंजय मुंडे, महेबुब शेखनंतर आता संजय राठोड प्रकरणीही का होत नाही कारवाई ?’

February 27, 2021
0

...

Read more

काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांच्या अत्यंत निकटवर्तीय आमदाराचा 55 व्या वर्षी कोरोनामुळे मृत्यू; मुंबईत घेतला अखेरचा श्वास

2 days ago

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनीच केली होती सचिन वाझेंची ‘शिफारस’

5 days ago

त्रास दिल्यामुळेच गर्भपात, शिवकुमारवर आणखी 3 गुन्हे दाखल

6 days ago

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

3 hours ago

…अन् राज्यमंत्री बच्चू कडूंनी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या कर्मचाऱ्याला दिला ‘प्रसाद’

6 days ago

मोठी बातमी ! दिल्लीतील AIIMS च्या 35 डॉक्टरांना कोरोना; अनेकांनी लसीचा दुसरा डोसही घेतला होता

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat