काबुल : वृत्तसंस्था – अफगाणिस्तान (Afghanistan) मध्ये तालिबानी दहशतवाद्यांचा (Taliban’s Terrorists) कहर सुरूआहे. ते अफगाणी सुरक्षा दलांवर सातत्याने हल्ले करत आहेत. या दरम्यान तालिबानकडून एक नवीन फर्मान (Taliban Asked For List Of Girls Above 15) जारी करण्यात आले आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की त्यांना 15 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व मुली आणि 45 वर्षापेक्षा कमी वयाच्या सर्व विधवा महिलांची यादी देण्यात यावी.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महिलांवर तालिबानची घाणेरडी नजर
द सन मध्ये प्रसिद्ध एका रिपोर्टनुसार, तालिबानने आश्वासन दिले आहे की ते आपल्या दहशतवाद्यांशी विवाह लावून दिल्यानंतर या महिलांना पाकिस्तानच्या वजीरिस्तानमध्ये पाठवतील. जर कुणी मुलगी मुस्लिम नसेल तर तिचे धर्मपरिवर्तन केले जाईल. तालिबानला या महिलांना आपल्या दहशतवाद्यांच्या गुलाम बनवायचे आहे. दहशतवादी या महिलांचा लैंगिक छळ करतील.
तालिबानने पत्र जारी करून मागवली यादी
तालिबान कल्चरल कमीशनकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रात म्हटले आहे की, सर्व इमाम आणि मौलवींनी तालिबानच्या कब्जातील परिसरात असणार्या 15 वर्षापेक्षा वयाच्या तरूणी आणि 45 वर्षापेक्षा कमी वयाच्या विधवा महिलांची यादी द्यावी. या महिलांना तालिबानच्या दहशतवाद्यांच्या हवाली करण्यात येईल.
तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ले वाढवले
अमेरिका, ब्रिटन आणि इतर देशांचे सैनिक अफगाणिस्तान सोडत आहेत आणि याचा फायदा घेत तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ले वाढवले आहेत. एका रिपोर्टनुसार, तालिबानने अफगाणिस्तानच्या 85 टक्के क्षेत्रावर कब्जा केला आहे.
महिलांना एकट्याने बाहेर पडण्यास बंदी
तालिबानने आपल्या कब्जातील परिसरात शरिया कायदा लागू केला आहे. येथे आता स्मोक करणे, दाढी कापणे आणि महिलांनी एकट्याने घराबाहेर पडण्यावर बंद घालण्यात आली आहे.
Web Title : afghanistan taliban asked mullahs for list of girls above 15 and widows under 45 to be married as slaves to their fighters
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update