काबुल : वृत्त संस्था – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एका लग्न समारंभात आत्मघातकी बॉम्ब हल्ला करण्यात आला आहे . या बॉम्ब स्फोटात ६३ जणांचा मृत्यू झाला असून जखमी झालेल्यांची संख्या १८२ वर गेली आहे. जखमी झालेल्यांमध्ये महिला तसेच लहान मुलांचा देखील समावेश असून त्यांना आता उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या बॉम्ब हल्ल्याची अजूनतरी कोणीही जबाबदारी घेतली नाही. हल्या मागचा नेमका हेतू कोणता याची माहिती अजून समोर आलेली नाही. बॉम्ब स्फोट झालेल्या या लग्न समारंभा ठिकाणी हजारो लोक उपस्थित होते. जखमी झालेल्यांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. त्यामुळे मृतांचा आकड्यात देखील वाढू होऊ शकतो. काबुल वर नेहमीच इस्लामिकी स्टेट आणि तालिबान यांचा डोळा असतो , त्यामुळे काबूलला सतत अश्या हल्ल्याना सामोरे जावे लागते. मात्र आजवर झालेल्या हल्ल्यांमध्ये हा हल्ला मोठा मानला जाऊ शकतो.
लग्नाच्या स्टेजवर झालेल्या या हल्ल्यावेळी स्टेजवर अनेक संगीतकार तसेच लहान मुले आणि स्त्रिया उपस्थित होत्या. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश असल्याची माहिती अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाने दिली.
काबुल मध्ये ऑगस्ट महिन्यातला हा दुसरा बॉम्बस्फोट आहे , ८ ऑगस्ट रोजी झालेल्या बॉम्ब हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू तर १४५ जखमी झाले होते. अफगणितनच्या सुरक्षा रक्षकांना यावेळी केंद्रित करण्यात आले होते. त्यासाठी एका गाडीचं वापर करण्यात आला होता.