Afghanistan Crisis | काबूल एअरपोर्टहून तालिबान्यांनी केलं 150 लोकांचे अपहरण; बऱ्याच भारतीय नागरिकांचा समावेश

Afghanistan Crisis | 150 people kidnappned by taliban from kabul including indians.

काबूल : वृत्तसंस्था  –  Afghanistan Crisis | तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan Crisis) जाऊन ताबा मिळवला आहे. तालिबानने कब्जा केल्यांनतर अफगाणिस्तानमधील परिस्थिती अधिकच चिघळली आहे. अशा चिंताजनक परिस्थितीमध्येच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काबूल (Kabul) विमानतळाहून (Airport) तालिबानने 150 नागरिकांचं अपहरण केलं आहे. मुख्यतः म्हणजे यामध्ये बऱ्याच भारतीय नागरिकांचा (Indian citizen) देखील समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. अपहरण केलेल्या नागरिकांच्या लोकशनबाबत अजून माहिती समजली नाही. मात्र, अपहरण करण्यामागे तालिबानचा उद्देश काय? याबाबत चर्चा होत आहे. परंतु, 150 जणांच्या अपहरणाच्या (abduction) वृताला तालिबानचे प्रवक्ते अहमदुल्लाह वासे (Ahmadullah Wase) याने धुडकावलं आहे.

या प्रकारावरून नागरिकांचं अपहरण केलं नसून त्यांना सुरक्षित विमानतळावर (Airport) पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. असं तालिबानने सांगितलं आहे. याबाबत माहिती एका वृत्तानुसार समोर आली आहे. दरम्यान, या घटनेबाबत काबूलशी संबंधित सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे की, तालिबानने ज्या नागरिकांना ताब्यात घेतलं आहे, त्यांना कागदपत्रे तपासण्यासाठी नेल्याची शक्यता आहे. दरम्यान त्यावेळी काबूल येथील एका विश्वासू पत्रकारानं ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

तालिबानने (Taliban) केलेल्या कब्जानंतर अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना (Indians) बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारी सुमारे 140 नागरिक भारतात परत आले. दरम्यान, तेथून 85 भारतीयांना घेऊन भारतीय C-130J हे विमान भारतात परतत आहे. असं म्हटलं आहे की, विमान इंधनासाठी ताजिकिस्तानमध्ये (Tajikistan) उतरले होते. हे विमान काबूलहून दिल्लीला (Delhi) येत आहे. या दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर भारताकडून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम केले जात आहे. दूतावासात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं. मात्र अजूनही अफगाणिस्तानमध्ये मोठ्या संख्येनं लोक अडकले आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या लोकांना परत आणण्यासाठी विशेष व्यवस्था केली असून स्पेशल अफगानिस्तान सेल तयार केला गेला आहे.

 

Web Title : Afghanistan Crisis | 150 people kidnappned by taliban from kabul including indians.

 

Mumbai Crime Branch Police | दोन तासाचे 2 लाख रुपये; मुंबईतील अभिनेत्री आणि टॉप मॉडेलच्या सेक्स रॅकेटबाबत धक्कादायक खुलासा

Maharashtra Police | महिला पोलिसाची बदनामी करणारा निघाला पोलिस कर्मचारी; पोलीस दलात खळबळ

Bank Scam | 4300 कोटीच्या घोटाळ्याच्या आरोपात सहभागी असलेल्या ‘या’ व्यक्तीच्या पत्नीने 9 महिन्याच्या बाळाला दिले 40 कोटी रुपयांचे गिफ्ट, जाणून घ्या

Pune Crime | ‘तू पांढऱ्या पायाची आहेस’ असे म्हणून विवाहितेला मारहाण; पतीसह 5 जणांवर FIR