भीषण अपघातानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूची झुंज ठरली अपयशी, झाला मृत्यू

najeeb tarakai

बहुजननामा ऑनलाइन – अफगाणिस्तानचा सलामीवीर नजीब तारकाई(najeeb tarakai) याचे मंगळवारी निधन झाले. काही दिवसांपूर्वी रस्ता ओलांडताना कारने दिलेल्या धडकेत नजीब(najeeb tarakai) गंभीर जखमी झाला होता. त्यात नजीबच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. नजीबच्या निधनाने अफगाणिस्तासह आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने ट्विट करत नजीब तारकाईच्या मृत्यूनंतर श्रद्धांजली वाहिली आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नजीब तारकाईच्या अपघातानंतर सर्जरी केल्यानंतर सुद्धा त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं होत. तसेच एसीबीकडून तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली जात आहे, असे ट्विट करण्यात आलं होत.

२९ वर्षीय नजीबने २०१४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होत. त्याने एक वन डे आणि १२ ट्वेंटी-२० सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केलं आहे. २०१७ मध्ये त्याने आयर्लंड विरोधात ट्वेंटी-२० सामन्यांत ९० धावांची खेळी केली होती. त्या सामन्यात अफगाणिस्तानने १७ धावांनी आयर्लंडला पराभूत केलं होत. नजीबच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६ शतके आणि १० अर्धशतके आहेत. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत ३३ ट्वेंटी-२० सामने खेळले आणि त्यात ७०० धावा केल्या आहेत. २०१९ मध्ये नजीबने बांग्लादेशाविरुद्ध ढाका येथे अखेरचा ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.