AESA Pune | ‘ए ई एस ए’ व्यावसायिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ 17 मार्च रोजी; ‘आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’च्या वतीने आयोजन

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – AESA Pune | ‘आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’च्या (AESA Pune – Architects, Engineers & Surveyors Association) वतीने ‘एईएसए व्यावसायिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ’ १७ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. जयसिम फाउंटनहेड (बंगळुरू)चे संचालक आर्किटेक्ट कृष्ण राव जयसिम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून राज्याच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमात असणार आहे. आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा आणि सर्वोत्तम बांधकाम प्रकल्पांचा गौरव या कार्यक्रमात केला जाणार आहे. (AESA Pune)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पारितोषिक वितरण समारंभ १७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता कम्म्युनिटी हॉल,पीवायसी जिमखाना येथे होणार आहे. पारितोषिक वितरण समारंभाचे हे २८ वे वर्ष आहे.प्रत्येकी ५० हजार रक्कम ,मानचिन्ह असे या पारितोषिकांचे स्वरूप आहे.रहिवासी बंगला,इमारत,सोसायटी,इन्स्टिट्
‘आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’च्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत असोसिएशनचे प्रेसिडेंट इंजिनिअर पराग लकडे,चेअरमन आर्किटेक्ट महेश बांगड,खजिनदार हेमंत खिरे,सहसचिव मनाली महाजन यांनी ही माहिती दिली. श्रमिक पत्रकार संघ येथे शनिवारी ही पत्रकार परिषद झाली.
असोसिएशनचे माजी अध्यक्ष आर्कीटेक्ट पुष्कर कानविंदे हे या पारितोषिक वितरण सोहळ्याचे निमंत्रक असून एस
जे काँट्रॅक्ट्स प्रा लि ,कुमार प्रॉपर्टीज,रोहन बिल्डर्स,कुमार बिल्डर्स प्रा लि ,बेहरे -राठी ग्रुप ,
स्ट्रक्चरल डिझायनर्स अँड कन्सल्टंट्स प्रा लि यांचे सहकार्य या सोहळ्याला लाभले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुण्याच्या विकासात ५३ वर्षांचे योगदान
‘आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन'(ए ई एस ए ), पुणे ही शहराच्या सर्वांगिण सुधारणेसाठी सर्व प्रकारच्या बांधकाम व्यावसायिकांनी एकत्र येऊन काम करण्यासाठी १९७० मध्ये स्थापन झालेली एक आगळीवेगळी संस्था आहे. ज्ञानाचा प्रसार, मूल्याधारित व्यवसाय, आणि स्थानिक सरकारी संस्थांबरोबर सामंजस्याने काम करण्याठी संस्था सतत कार्यरत असते. यामुळे असोसिएशनला आणि व्यावसायिक गुणवत्ता पारितोषिकांना बांधकाम क्षेत्रात मानाचे स्थान आहे.
वास्तुकला आणि स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्च दर्जा आणि उत्कृष्ट गुणवत्तेचा गौरव करून क्षतसेच हे
काम समाजासमोर आणण्याच्या दृष्टीने गेल्या २७ वर्षांपासून ‘आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’
ही पारितोषिके देत आहे. वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियंते, विकसक तसेच या क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या
गौरवास तसेच आदरास ही पारितोषिके पात्र झाली आहेत.
Web Title : AESA Pune | ‘AESA’ Professional Quality Award Distribution Ceremony on March 17; Organized by ‘Architects, Engineers and Surveyors Association’
हे देखील वाचा :
Jain Samaj | जैन समाजाची समाजाप्रती लोककल्याणकारी भावना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Jain Samaj | जैन समाजाची आचार्य पदवी ही एक तपश्चर्या – देवेंद्र फडणवीस
Comments are closed.