मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सिंगर अदनान सामीच्या एका ट्विटने सोशलवर राडा घातला आहे. अदनान सामीने या ट्विटमध्ये भारत आणि पाकिस्तानबाबत वक्तव्य केलं आहे. त्यामुळे अदनान सामीला तिखट शब्दात प्रतिक्रिया मिळत आहेत. अदनान सामीने ट्विटमध्ये भारतात बीफ आणि पाकिस्तानात दारू खुलेआम मिळण्याबाबत भाष्य केलं आहे. सामीने पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. यामुळे अदनानला अनेक फॉलोवर्सच्या संतापाचा सामना करावा लागला आहे.
आपल्या ट्विटमध्ये अदनान सामीने म्हटले आहे की, “एक गोष्ट तर स्पष्ट आहे. भारतात बीफ त्याप्रमाणे खुलेआम मिळतं जसं इस्लामिक देश पाकिस्तानमध्ये दारू मिळते.” अदनान समाीच्या या ट्विटमुळे त्याला विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
https://twitter.com/AdnanSamiLive/status/1163055225038659584
प्रसिद्ध सिंगर अदनान सामीने 2016 मध्ये भारतीय नागरिकता घेतली होती. तेव्हापासून तो भारतात वास्तव्यास आहे. त्याचा जन्म 15 ऑगस्ट रोजी झाला होता. याआधी अदनान पाकिस्तानचा नागरिक होता. ब्रिटेनमध्ये जन्मलेला अदनान सामी आज एक प्रसिद्ध सिंगर आहे. अनेक प्रायव्हेट अल्बम व्यतिरीक्त त्याने बॉलिवूड सिनेमांमधील गाण्यांसाठीही आपला आवाज दिला आहे.