भोपाळ : वृत्तसंस्था – दलित तरुणावर प्रेम केल्याने नावेवाईकांनी आपल्याच मुलीला अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. ही घटना मध्य प्रदेशातील धार येथे घडली. त्यानंतर याप्रकऱणी ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चौघांना अटक करण्यात आली आहे.
धार गावातील गतबोरी या गावात राहणार्या आदीवासी समाजातील तरुणीचे एका दलित मुलावर प्रेम जडले. त्यानंतर ही तरुणी या तरुणासोबत पळून गेली होती. ती गावात परतली तेव्हा नातेवाईकांनी तिला आदीवासी मुलासोबत लग्न करण्याचा आग्रह धरला. मात्र मुलीने नकार देत दलित मुलासोबतच संसार करणार असल्याचे सांगितले. तेव्हा संतप्त झालेल्या नातेवाईकांनी तिला लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला तेव्हा या प्रकरणाला वाचा फुटली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सरदार, महेश, डोंगर सिंह, किला या चार जणांना अटक केली आहे.