अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील तरुण नेते, मंत्री यांच्याशी तरुणाईचा संवाद असा आशय घेऊन मेधा -२०२० युवा संस्कृतीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात मंत्री आदित्य ठाकरे, रोहित पवार, आदिती तटकरे, ऋतुराज पाटील, धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अवधूत गुप्ते यांनी केलं यावेळी आदित्य ठाकरेंना कोणाचा अधिक राग येतो, राज ठाकरे की नारायण राणे ? असा प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझे वडील यांना देखील असे प्रश्न अनेकदा विचारले जातात. यावर सर्वांना मी माफ केलं असं उत्तर उद्धव ठाकरेंकडून देण्यात येतं असं आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच मी माफ करण्याइतका मोठा नाही. परंतु राजकारणात राग वैगरे धरायचा नसतो. कोण कसही वागू दे मात्र आपण स्वच्छ मनाने राहिलं पाहिजे आणि वागलं पाहिजे असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. संगमनेरमध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मला आदित्यचं म्हणा …
या कार्यक्रमादरम्यान आदित्य ठाकरेंना मुलाखातकार अवधूत गुप्ते यांनी साहेब म्हटल्यावर प्रोटोकॉल लागू असला तरी माझा उल्लेख आदित्य साहेब करु नका. मला आदित्यच म्हणत जा असं आदित्य ठाकरे यांनी अवधूत गुप्ते यांना सांगितले. तसेच रॅपिड फायर प्रश्नात बायको आईच्या पसंतीची करणार की स्वत: च्या असा प्रश्न आदित्य यांना विचारण्यात आला त्यावर यावर मला पहिलं काम करायचं असल्याचे आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले. पुढे कोणाचं व्यक्तिमत्व जास्त आवडत अजित पवार की देवेंद्र फडणवीस यावर आदित्य यांनी खऱ्या मनाने सांगायचे तर मला अजितदादांच व्यक्तिमत्व आवडते असे सांगितलं.
यावेळी पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘आम्ही तरुण आमदार एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी काही तरी करू इच्छितो. ज्या ज्या मिनिटाला जे गरजेचं असतं, ते केलं पाहिजे. टेन्शन बाजूला सोडून मजा करणं गरजेचं आहे. मी अनेक फेस्टिव्हल पाहिले, पण थोडं वेगळं आहे. युवा पिढी मनातले प्रश्न विचारलाय लागली आहे. आधी मंत्री, नेते समोर असल्यावर तरुणांवर थोडं दडपण असायचं. असे ते म्हणाले तसेच शपथविधीसाठी आईचं नाव घेणं हा माझ्यासाठी मोठा क्षण होता, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.