मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी राजा राममोहन रॉय हिंदू समाजसुधारक नव्हते. तर ते ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत होत असा गंभीर आरोप केल्यानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री पायल रहतोगीने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. यावेळी त्यांनी थेट अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय कुळाचे नसून त्यांचा जन्म क्षुद्र जातीत झाल्याचं वादग्रस्त वक्तव्य तिने केले आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पायलने ट्विट केले त्यात त्यांनी “शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत, तर त्यांचा जन्म क्षुद्र जातीत झाला होता”, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्या पोस्ट सोबत तिने छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोही शेअर केला आहे.पायलने समाज माध्यमांवर पती संग्राम सिंगसोबतचा फोटो शेअर करत छ. शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यासोबतच महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिलं ? असा प्रश्नही तिने विचारला आहे.
दरम्यान, यापूर्वीदेखील पायलने अनेक वेळा अशी वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. यापूर्वी राममोहन रॉय ,कमल हसन यांच्यावर टीका करुन चर्चेत आली होती. त्यानंतर आता थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर टीका केली आहे.
https://twitter.com/Payal_Rhatgi/status/1134834382273994752