बहुजननामा ऑनलाइन – अभिनेत्री कंगना रणौतने उर्मिला मातोंडकरवर अत्यंत खालच्या पातळीवरची टीका केली आहे. उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार असल्याचे तिने म्हटले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. उर्मिला मातोंडकरने सपा राज्यसभा खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला होता.
इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत तेच इंडस्ट्रीची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे जया बच्चन यांनी म्हटले होते. त्यांनी अभिनेता व भाजप खासदार रवी किशन यांच्यावर निशाणा साधत वक्तव्य केले होते. दरम्यान, कंगनाने देखील असा दावा केला आहे की, 99 टक्के फिल्म इंडस्ट्री स्टार्स हे ड्रगच्या अधीन आहेत. दरम्यान यावर उत्तर देताना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने ’संपूर्ण देशसमोर ड्रग्जचा धोका आहे.
कंगनाला माहित आहे का हिमाचल हे ड्रग्जचे उगमस्थान आहे ? तिने तिच्या स्वत:च्या राज्यापासून सुरुवात करायला हवी.’ त्यानंतर काल कंगना-उर्मिलाच्या वादाने वेगळे वळण घेतले. ’उर्मिला देखील सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. मला माहित आहे की ते अत्यंत निंदनीय आहे. पण ती तिच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखली जात नाही. ती कशासाठी ओळखली जाते? सॉफ्ट पॉर्नसाठी ना? असे वक्तव्य केले. कंगनाच्या या विधानानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यातून तिने कंगनाला तिचे नाव न घेता उत्तर देण्याचा प्रयत्न केला.