मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सुशांत सिंह हा टीव्ही वरील प्रसिद्ध चेहरा आहे. याचबरोबर तो अनेक सामाजिक विषयांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले निर्भीड मत व्यक्त करत असतो. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपले ट्विटर अकाऊंट ब्लॉक झाले असल्याची माहिती दिली. यावेळी त्याने ट्विटर ब्लॉक झालेल्याचा स्क्रीन शॉट शेअर केला. त्यावर ‘सुशांत आपले अकाऊंट स्थगित केले आहे. कायदेशीर मागणीनुसार तुमचे भारतातील अकाऊंट स्थगित करण्यात आले आहे.’ असा संदेश लिहिला होता. अभिनेता सुशांत सिंह यांनी बुधवारी ट्विटर आणि भारत सरकारचा अशा प्रकारे अनोखा निषेध नोंदवला.
सुशांत सिंह आणि इतरांची अकाऊंट ट्विटरने पहिल्यांदाच ब्लॉक केलेली नाहीत. यापूर्वी शेतकरी आंदोलनादरम्यान, सुशांतने पत्रकार आणि न्यूज पोर्टल विरुद्ध शेतकरी आंदोलनाचे वार्तांकन केल्याप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआर विरुद्ध आवाज उठवला होता. यावेळीही सुशांतसह अनेकांची अकाऊंट ब्लॉक करण्यात आली होती. त्याचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक झाल्यानंतर त्याने ट्विटरला ‘अकाऊंट ब्लॉक करण्यापूर्वी एखादी नोटिस तरी द्यायची सभ्यता असावी.’ असा टोमणा मारला. याचबरोबर त्याने आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएसला टॅग करत त्यांचे उपरोधिक आभार मानले. याचबरोबर ‘तुम्ही मला योग्य मार्गावर आहे हे दाखवून दिल्याबद्दल आभार.’ असेही तो म्हणाला.
दरम्यान, सुशांतचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक झाल्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विटरला सवाल केला. तिने ‘सुशांत आणि इतरांचे ट्विटर अकाऊंट का ब्लॉक केले?’ असा सवाल ट्विटर इंडियाला केला. तर अभिनेता गुलशन यांनी ‘पुन्हा एकदा अरे बापरे पण, कशासाठी? अशी प्रतिक्रिया दिली.