बहुजननामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी ती ज्या निमित्ताने चर्चेत आली आहे ते थोडं गंभीर कारण आहे. कारण मॉडेल पूनम पांडे आणि नवरा सॅम बॉम्बे (सॅम अहमद) यांच्यात लग्नाच्या अवघ्या 22 दिवसांनंतर वाद झाला असून तो पोलीस स्टेशनपर्यंत पोहचला आहे. पूनम पांडेने तिच्या पतीविरोधात पोलिसात तक्रार विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. तिच्या तक्रारीनंतर गोव्यातील काणकोण पोलिसांनी सॅम बॉम्बे यास ताब्यात घेतले आहे.
अभिनेत्री पूनम पांडेने सोमवारी रात्री पतीवर गंभीर आरोप करत विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. पतीने मारहाण केल्याचा आरोपदेखील तिने तक्रारीत केला आहे. तक्रार दाखल केल्यानंतर काणकोण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी सॅमला अटक केली.
विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वीच पूनमने इन्स्टाग्राम अकाऊंटवर बेस्ट हनिमून असे कॅप्शन देत एक व्हिडिओ अपलोड केला होता. सॅम बॉम्बे चित्रपट निर्माता असून दोघांनी 1 सप्टेंबरला लग्न केले आणि त्यानंतर दोघेही गोव्यात शुटिंगसाठी करत होते होते. यादरम्यान, ते ज्या हॉटेलवर उतरले होते, तिथेच दोघांमध्ये सोमवारी जोरदार भांडण झाले. यानंतर पूनम पांडेने पोलीस ठाणे गाठून सॅमविरूद्ध तक्रार दाखल केली.
पूनम पांडे चित्रपटांपेक्षा न्यूड फोटोंसाठीच चर्चेत असते. तिचे एक सेमी न्यूड व्हिडिओचे अॅप असून यातील व्हिडिओ पैसे भरून पहाता येतात. याच अॅपसाठी ती गोव्यात व्हिडिओ शूट करत होती. नशा आणि इतर काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिने काम केलेले आहे.