बहुजननामा ऑनलाईन – ‘रामायण’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता अरुण गोविल यांनी गुरुवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. रामानंद सागर यांची मालिका ‘रामायण’ मध्ये त्यांनी भगवान रामाची भूमिका केली होती. अरुण गोविल यांनी दिल्लीमध्ये भाजपा कार्यालयात पार्टीची सदस्यता स्वीकारली. यावेळी बीजेपीचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह उपस्थित होते.
Actor Arun Govil joins BJP at party headquarters in New Delhi. #JoinBJP pic.twitter.com/eiI1aCdRRt
— BJP (@BJP4India) March 18, 2021
बीजेपीमध्ये प्रवेश केल्यानंतर अरुण गोविल म्हणाले, यावेळी जे आमचे कर्तव्य आहे ते केले पाहिजे. मला राजकारण याआधी समजत नव्हते, परंतू मोदीजींनी जेव्हापासून देशाला सांभाळले आहे तेव्हापासून देशाची परिभाषा बदलली आहे. मी माझ्या मनात आणि डोक्यात जे येते ते मी करून देतो.
५ राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अरुण गोविल यांची बीजेपीमध्ये झालेली एन्ट्री विशेष मानली जात आहे. पार्टीमध्ये अरुण गोविल यांची जबाबदारी काय आहे हे अजूनही कळले नाही.